IND W vs SL W : स्मृती मानधनाचा नवा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी जगातील चौथीच खेळाडू

खास क्लबमध्ये मिळवले स्थान –
या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये स्मृतीला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. मात्र, तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर चौथ्या सामन्यात २७ धावांचा टप्पा ओलांडताच तिने हा मैलाचा दगड गाठला. महिला क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनच खेळाडूंनी १० हजार धावांचा आकडा पार केला होता. स्मृतीच्या समावेशामुळे आता या ‘स्पेशल क्लब’मध्ये चार दिग्गज खेळाडू झाले आहेत. विशेष म्हणजे तिने ही कामगिरी सर्वात कमी डावात केली आहे.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू:
- मिताली राज (भारत): १०,८६८ धावा.
- सुझी बेट्स (न्यूझीलंड): १०,६५२ धावा
- शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड): १०,२७३ धावा
- स्मृती मानधना (भारत): १०,०३० धावा
- स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज): ९,३०१ धावा
हेही वाचा – ILT20 2025 : ३८ वर्षीय पोलार्ड तात्याचा रुद्रावतार! एकाच षटकात तब्बल ‘इतक्या’ धावांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO
कशी आहे स्मृतीची आतापर्यंतची कामगिरी?
स्मृती मानधनाने तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. तिच्या कारकिर्दीचा आढावा घेतल्यास तिची आकडेवारी थक्क करणारी आहे:
- वनडे क्रिकेट: ११७ सामन्यांत ४८.३८ च्या सरासरीने ५,३२२ धावा.
- टी-२० क्रिकेट: १५७ सामन्यांत २९.८७ च्या सरासरीने ४,०५० पेक्षा जास्त धावा. (टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे).
- कसोटी क्रिकेट: ७ सामन्यांत ५७.१८ च्या सरासरीने ६२९ धावा.
हेही वाचा – BBL 2025 : मैदानावर चुकला काळजाचा ठोका! रौफ-कार्टराइटचा भयानक अपघात थोडक्यात टळला, पाहा थरारक VIDEO
आजच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. स्मृतीने आपल्या या कामगिरीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा आनंद दिला असून, लवकरच ती या यादीत अव्वल स्थानी पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





