ILT20 2025 : ३८ वर्षीय पोलार्ड तात्याचा रुद्रावतार! एकाच षटकात तब्बल ‘इतक्या’ धावांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO

Kieron Pollard smashed 30 runs an over : आयएलटी-२० (ILT20) २०२५ च्या हंगामात एमआय एमिरेट्सने (MI Emirates) आपला दबदबा कायम राखत दुबई कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयात कर्णधार किरॉन पोलार्डची आक्रमक फलंदाजी आणि युवा फिरकीपटू अल्लाह मोहम्मद गझनफरची भेदक गोलंदाजी निर्णायक ठरली.
दुबई कॅपिटल्सची फलंदाजी कोसळली –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दुबई कॅपिटल्सच्या फलंदाजांना एमआय एमिरेट्सच्या गोलंदाजांसमोर संघर्ष करावा लागला. कर्णधार मोहम्मद नबीने सर्वाधिक २२ धावा केल्या, तर जेम्स नीशमने २१ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने संपूर्ण संघ केवळ १२२ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.
Kieron Pollard kills the chase with a 3️⃣0️⃣ run over! 🥵💥
Unmatched, belligerent hitting by the skipper. Clean, powerful, devastating! 🔥#MIEvDC #DPWorldILT20 #AllInForCricket #WhereTheWorldPlays pic.twitter.com/yMK70Wzx3R
— International League T20 (@ILT20Official) December 27, 2025
एमआय एमिरेट्सकडून अल्लाह गझनफरने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४ षटकांत २८ धावा देऊन ३ विकेट्स घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला फझलहक फारुकी, शाकिब अल हसन आणि अरब गुल यांनी प्रत्येकी एक विकेट्स मिळवून चांगली साथ दिली.
हेही वाचा – VVS Laxman : ‘आम्ही लक्ष्मणशी बोललो…’, बीसीसीआयचा मोठा खुलासा; गौतम गंभीरच्या पदावर आली मोठी अपडेट
पोलार्डचा ‘रुद्र’ अवतार: एकाच षटकात कुटल्या ३० धावा –
१२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय एमिरेट्सची सुरुवात दमदार झाली. मुहम्मद वसीम आणि आंद्रे फ्लेचर यांनी ४७ धावांची सलामी दिली. त्यानंतर टॉम बँटनने २८ धावांची खेळी केली. मात्र, खरा थरार पाहायला मिळाला तो कर्णधार किरॉन पोलार्डच्या फलंदाजीत. पोलार्डने अवघ्या ३१ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी केली.
ज्यात ५ उत्तुंग षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. सामन्यातील १५ वे षटक वकार सलामखेल टाकत होता, ज्यामध्ये पोलार्डने पूर्णतः ताबा मिळवला. त्याने या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्यावर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकून एकाच षटकात एकूण ३० धावा वसूल केल्या.
हेही वाचा – AUS vs ENG : बॉक्सिंग डे कसोटी पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! ‘या’ दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
पोलार्डच्या या फटकेबाजीमुळे एमआय एमिरेट्सने अवघ्या १६.४ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून विजय मिळवला. दुबई कॅपिटल्सकडून एकमेव विकेट हैदर अलीने घेतली, तर इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले. या विजयासह एमआय एमिरेट्सने स्पर्धेत आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे.





