Muneeba Ali Run Out : मुनीबा अली MCC च्या नियमांनुसार रनआऊट होती की नाही? नियम काय सांगतो? जाणून घ्या

Muneeba Ali Run Out in IND W vs PAK W : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठा वाद झाला. पाकिस्तानी सलामीवीर मुनीबा अलीच्या रनआऊट निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिसऱ्या पंचांनी दिलेल्या रनआऊट निर्णयामुळे पाकिस्तानी संघातील खेळाडूंमध्ये नाराजी पसरली, तर त्यांच्या कर्णधाराने सीमारेषेवर उभे राहून चौथ्या पंचांकडे या निर्णयाचा विरोध नोंदवला. या प्रकरणावरून क्रिकेट नियमांवरही जोरदार चर्चा सुरू आहे.
एमसीसीचा नियम काय सांगतो?
मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या नियमांनुसार तिसऱ्या पंचांचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुनीबा अलीच्या रनआऊट प्रकरणात एमसीसीच्या खेळाच्या अटींनुसार नियम क्रमांक 30.1 नुसार, जोपर्यंत फलंदाजाचा शरीराचा किंवा बॅटचा कोणताही भाग पॉपिंग क्रीजच्या मागे जमिनीवर टेकलेला नाही, तोपर्यंत फलंदाजाला क्रीजच्या बाहेर मानले जाते.
First Not-out and then it’s OUT
A lack of awareness at the striker’s end as Muneeba Ali departs for just 2️⃣
📸: JioHotstar #INDWvPAKW #CWC2025 #ODIs #Insidesport #Cricket #WomensWorldCup2025 pic.twitter.com/uBhbbKeVXO
— 𝓐𝓶𝓲𝓽 ✨🔥 (@Amitpasi34) October 5, 2025
त्यानंतर नियम क्रमांक 30.2 नुसार, जर फलंदाज पॉपिंग क्रीजच्या दिशेने धावत असेल किंवा डाइव्ह मारत असेल आणि त्याच्या शरीराचा किंवा बॅटचा कोणताही भाग जमिनीवर टेकलेला असेल, तर त्यानंतर बॅट आणि जमीन किंवा बॅट आणि शरीर यांच्यातील संपर्क तुटला तरी फलंदाजाला क्रीजच्या बाहेर मानले जाणार नाही.
मात्र, मुनीबा अलीच्या बाबतीत ती धावत नव्हती किंवा डाइव्ह मारत नव्हती. त्यामुळे तिला क्रीजच्या बाहेर मानले गेले आणि तिसऱ्या पंचांनी नियमांनुसार योग्य निर्णय दिला. हा नियम धावणे किंवा डाइव्ह मारण्याच्या परिस्थितीशी संबंधित आहे. मुनीबा अलीच्या बाबतीत ती उभी होती आणि चेंडू अजूनही डेड झाला नव्हता आणि तिने स्वतःला पॉपिंग क्रीजच्या आत आणले नव्हते.
दीप्ती शर्माने केले मुनीबाला रनआऊट –
@cricketaakash – The wicket is about to come,
After that a wicket came in the next over.
What a prediction sir, I really salute you.
Kranti Gaud to Muneeba Ali, THATS OUT!! Run Out!!#INDWvPAKW #ICCWomensWorldCup2025 pic.twitter.com/YPvzAS0KL1
— Asia Voice 🎤 (@Asianewss) October 5, 2025
पाकिस्तानच्या डावातील चौथ्या षटकात क्रांती गौडच्या चेंडूवर मुनीबा अली पॉपिंग क्रीजच्या किंचित पुढे उभी होती. षटकातील शेवटच्या चेंडूवर चेंडू तिच्या पॅडला लागून थेट स्लिपच्या दिशेने गेला. यावेळी क्रांतीने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली, परंतु दीप्ती शर्माने सावधगिरी दाखवत चेंडू पकडून तात्काळ यष्ट्यांवर थ्रो केला.
हेही वाचा – IND W vs PAK W : भारत-पाकिस्तान सामना अचानक का थांबवला? नेमकं मैदानात घडलं तरी काय? जाणून घ्या
मुनीबाने प्रथम आपली बॅट क्रीजच्या आत ठेवली होती, परंतु चेंडू यष्ट्यांना लागला तेव्हा तिने बॅट वर उचलले आणि ती पॉपिंग क्रीजच्या बाहेर उभी होती. मुनीबा अलीला रनआऊट जाहीर केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्णधाराने चौथ्या पंचांशी चर्चा करत निर्णयाचा विरोध केला. मात्र, एमसीसीच्या नियमांनुसार तिसऱ्या पंचांचा निर्णय अचूक होता.





