IND W vs PAK W : भारत-पाकिस्तान सामना अचानक का थांबवला? नेमकं मैदानात घडलं तरी काय? जाणून घ्या

Mosquitoes Disrupt IND W vs PAK W Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला वनडे विश्वचषक 2025 चा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 247 धावा करत पाकिस्तानला 248 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, सामन्यादरम्यान मैदानावर मच्छरांचा प्रचंड उपद्रव झाल्याने पंचांनी 15 मिनिटांसाठी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
कीटकनाशक फवारणीनंतरही मच्छरांचा त्रास कायम –
विशेष म्हणजे, या थांबण्याचे कारण पाऊस किंवा खराब हवामान नसून मच्छरांचा त्रास होता. मच्छरांमुळे खेळाडूंना त्रास होत असल्याने पंचांनी कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी खेळ थांबवला. यानंतर कीटकनाशकाची फवारणी करूनही मच्छरांचा उपद्रव कमी झाला नाही.
The amount of insects flying around the batter and the keeper is just crazy.. don’t know how both of them are concentrating with so much irritating bugs around them.. #INDWvPAKW pic.twitter.com/Zf8CGqGt5i
— Gaurav Nandan Tripathi | गौरव नंदन त्रिपाठी (@Cric_Beyond_Ent) October 5, 2025
खेळ पुन्हा सुरू झाल्यावर पिचच्या आजूबाजूला मच्छर मोठ्या संख्येने दिसत होते. भारतीय संघाच्या फलंदाजांना मच्छरांमुळे फलंदाजी करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. यासंदर्भात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी मैदानी पंचांशी चर्चा देखील केली. मात्र, परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.
ड्रेसिंग रूममधून मागवले स्प्रे –
Like Army, Like Cricketers 😈
Lousy, Shoddy & inferior Tactics.
Fatima Sana behaves like Female Asim Munir. 😂#INDvsPAK #INDWvsPAKW #INDWvPAKW #CWC2025 #WomensWorldCup2025 pic.twitter.com/5quaoaduTL
— 🦋 कनिका 🦋 (@Kanika_Says) October 5, 2025
Flying bugs stop play, fumigation required in the India-Pak game in the Women’s ODI World Cup in Colombo #INDvsPAK #INDWvPAKW #WomensWorldCup2025 @pra0902 @SunilWarrier1 @SushilAaron @nikhilsahni_ pic.twitter.com/dqzXklsn2p
— Avijit Ghosh (@cinemawaleghosh) October 5, 2025
यानंतर, पाकिस्तानी संघाने त्यांच्या ड्रेसिंग रूममधून स्प्रे आणले आणि ते अधूनमधून मैदानावर वापरले. संपूर्ण सामन्यात खेळाडू वारंवार स्प्रे वापरताना दिसले, परंतु मच्छरांचा त्रास कमी झाला नाही. भारतीय संघाच्या खेळाडूंनीही त्यांच्या पद्धतीने परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला.
स्मृती आणि हरमनप्रीत यांची निराशाजनक कामगिरी –
Players are going off the field so pest control folks can spray the bugs away. My traumatised brain saw umpire calling people off and eyes went straight to the sky for signs of rain.
Good, the players were really getting bothered. Fumigation underway. Expect a 10-minute-ish… pic.twitter.com/WuoRTlJlSx
— Lavanya 🎙️🎥👩🏻💻 (@lav_narayanan) October 5, 2025
या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, विशेषतः स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून. परंतु, दोघींनीही साफ निराशा केली. स्मृती मंधाना अवघ्या 23 धावांवर बाद झाली, तर हरमनप्रीत कौरने 19 धावांची खेळी केली. या सामन्यात भारताची फलंदाजी इतकी खराब होती, एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या, तिने 65 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला. ज्यामुळे भारताला 50 षटकांत सर्वबाद 247 धावांपर्यंत मजल मारता आली.





