IND W vs PAK W : मुनीबा अलीच्या रनआऊटवरून पेटला नवा वाद, कर्णधार फातिमा सनाने पंचाशी घातली हुज्जत, पाहा VIDEO

IND W vs PAK W Muneeba Ali Runout controversy : महिला वनडे विश्वचषक 2025 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारच्या सामन्यात पाकिस्तानी सलामीवीर मुनीबा अलीच्या रनआऊटवरून मोठा वाद निर्माण झाला. स्ट्रायकरच्या टोकाला रनआऊट झालेल्या मुनीबाच्या निर्णयावर पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाने बाउंड्रीजवळ चौथ्या पंचांशी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय अष्टपैलू दीप्ति शर्माने मुनीबाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
मुनीबा अलीच्या रनआऊटचा वाद –
हा वाद क्रांति गौडच्या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घडला. चेंडू मुनीबाच्या पॅडवर लागला आणि भारतीय संघाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. पंचांनी ही अपील फेटाळली. मात्र, याचवेळी मुनीबा क्रीझच्या बाहेर होती. ती हळूहळू क्रीझकडे परतत होती, पण तिचा पाय क्रीझच्या बाहेर होता. तिने प्रथम बॅट जमिनीवर ठेवले, परंतु चेंडू स्टंप्सवर आदळला तेव्हा तिची बॅट हवेत होते आणि पाय क्रीझबाहेर होता.
First Not-out and then it’s OUT
A lack of awareness at the striker’s end as Muneeba Ali departs for just 2️⃣
📸: JioHotstar #INDWvPAKW #CWC2025 #ODIs #Insidesport #Cricket #WomensWorldCup2025 pic.twitter.com/uBhbbKeVXO
— 𝓐𝓶𝓲𝓽 ✨🔥 (@Amitpasi34) October 5, 2025
नेमका का पेटला वाद?
@cricketaakash – The wicket is about to come,
After that a wicket came in the next over.
What a prediction sir, I really salute you.
Kranti Gaud to Muneeba Ali, THATS OUT!! Run Out!!#INDWvPAKW #ICCWomensWorldCup2025 pic.twitter.com/YPvzAS0KL1
— Asia Voice 🎤 (@Asianewss) October 5, 2025
सुरुवातीला तिसऱ्या पंच केरिन क्लास्ते यांनी मुनीबाला नॉटआउट दिले. मात्र, पुन्हा व्हिज्युअल्स तपासल्यानंतर त्यांना दिसले की, चेंडू स्टंप्सवर आदळताना मुनीबाचे बॅट हवेत होते आणि ती क्रीझबाहेर होती. यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि अनेकदा तपासणीनंतर मुनीबाला बाद ठरवले. हा निर्णय पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाला अजिबात मान्य नव्हता. ती ड्रेसिंग रूममधून बाहेर येऊन चौथ्या पंचांशी वाद घालताना दिसली. मुनीबा बाउंड्रीजवळ पोहोचली तेव्हा फातिमा पंचांशी संतापाने बोलत होती. मुनीबाने 12 चेंडूंमध्ये 2 धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IND W vs PAK W : भारत-पाकिस्तान सामना अचानक का थांबवला? नेमकं मैदानात घडलं तरी काय? जाणून घ्या
पाकिस्तानसमोर 248 धावांचे लक्ष्य –
भारताने या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले. हरलीन देओलच्या 65 चेंडूंमध्ये 46 धावांच्या संयमी खेळी आणि ऋचा घोषच्या 20 चेंडूंमध्ये नाबाद 35 धावांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 10 गडी गमावून 247 धावा केल्या. पाकिस्तानने प्रथमच वनडेत भारतीय संघाला सर्वबाद केले. धीम्या खेळपट्टीवर भारतीय संघाची टॉप ऑर्डर लवकर कोसळली. सामन्यादरम्यान मच्छर हटवण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘फ्युमिगेशन ब्रेक’मुळेही अडथळा निर्माण झाला.





