IND vs ZIM 2nd T20 Match Result : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. याआधी शनिवारी झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला होता. मात्र, रविवारी भारतीय संघाने 24 तासाच्या आतच यजमान संघाकडून मागील पराभवाचा बदला घेतला आहे. शतकवीर अभिषेक शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 234 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने 2 बाद 229 अशी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 18.4 षटकांत 10 गडी गमावून केवळ 134 धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून वेसली मधेवेरे 39 चेंडूत 43, ब्रायन बेनेटने 9 चेंडूत 26 तर ल्यूक जोंग्वेने 26 चेंडूत 33 धावा केल्या.
For his maiden 💯 in his second T20I, Abhishek Sharma receives the Player of the Match 🏆#TeamIndia win by 100 runs and level the series 1️⃣ – 1️⃣
Scorecard ▶️ https://t.co/yO8XjNqmgW#TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/b72Y9LaAiq
— BCCI (@BCCI) July 7, 2024
या सामन्यात झिम्बाब्वेची सुरुवात डळमळीत झाली होती. यजमान झिम्बाब्वे जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघाला खराब सुरुवात आणि सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही. मुकेश कुमारने पहिल्याच षटकात इनोसंट कायाला बोल्ड केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर वेसली मधेवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी पदभार स्वीकारला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 15 चेंडूत 36 धावांची भागीदारी झाली.
एकेकाळी झिम्बाब्वेची धावसंख्या एका विकेटवर 40 धावा होती, पण पुढच्या 6 धावांतच संघाने 3 महत्त्वाचे विकेट गमावले. तिसऱ्या षटकात मुकेश कुमारने पुन्हा एकदा स्फोटक गोलंदाजी करताना बेनेटला बोल्ड केले. तो 26 धावा करून बाद झाला. यानंतर आवेश खानने कहर केला. डावाच्या चौथ्या षटकात त्याने दोन बळी घेतले. आवेशने मायर्स (0) आणि कर्णधार रझा (4) यांना बाद केले. या सामन्यात कॅम्पबेलने 10, मदांडेने शून्य, मसाकादझाने एक, मुझाराबानीने दोन आणि चताराने (नाबाद) शून्य धावा केल्या.
मुकेश कुमारने टीम इंडियासाठी विकेट्स घेण्यास सुरुवात केली. त्याने सुरूवातीच्या स्पेलमध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई पुन्हा एकदा घातक ठरला, त्याने 4 षटकांत केवळ 11 धावांत 2 बळी घेतले. भारताकडून आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी सर्वाधिक बळी घेतले, या दोघांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही एक विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी, तत्पूर्वी, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माचे शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर 234 धावा केल्या होत्या. अभिषेकने कारकिर्दीतील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यासाठी त्याने केवळ 46 चेंडू घेतले. त्याचवेळी गायकवाडने 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात तो 77 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी रिंकू सिंगनेही 22 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी साकारली. दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार गिलला केवळ दोन धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून मुझाराबानी आणि मसाकादझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.