IND vs ZIM 5th T20 : झिम्बाब्वेचा भारताविरूध्द गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाच्या Playing XI मध्ये मोठे बदल….

IND vs ZIM 5th T20 (Playing XI Update) : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Zimbabwe won the toss and Elected to Bowl) त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
🚨 Toss Update 🚨
Zimbabwe elect to field in the 5th and final T20I.
Follow The Match ▶️ https://t.co/TZH0TNJcBQ#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/zKc5XsarxI
— BCCI (@BCCI) July 14, 2024
भारतीय संघ दोन बदलांसह या सामन्यात दाखल झाला आहे. मुकेश कुमार आणि रियान पराग यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. रुतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ एका बदलाने खेळताना दिसणार आहे. चताराच्या जागी ब्रँडन मावुतोला संधी मिळाली आहे.
IND vs ZIM : दोन्ही संघाचं खालीलप्रमाणे….
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.
झिम्बाब्वे : वेस्ली माधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), ब्रँडन मावुथा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी.
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने दमदार फलंदाजी करत 10 गडी राखून विजय मिळवला होता. यासह टी-20 क्रिकेटमध्ये एखाद्या संघावर 10 विकेट्सने विजय मिळण्याचा पराक्रम टीम इंडियाने दुसऱ्यांदा केला होता.





