IND vs ZIM 5th T20 : सॅमसनचे दमदार अर्धशतक, टीम इंडियाचं झिम्बाब्वेसमोर 168 धावांचे लक्ष्य…

IND vs ZIM 5th T20 : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा याने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पाचव्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 20 षटकात 6 बाद 167 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.
या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या. वास्तविक, सिकंदर रझाने पहिला चेंडू नो टाकला होता ज्यावर जयस्वालने षटकार मारला होता. यानंतर फ्री हिटचा फायदा घेत त्याने आणखी एक षटकार मारला. मात्र, या षटकातील चौथ्या चेंडूवर रझाने त्याला क्लिनबोल्ड करत बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा फलंदाजीला आला त्याला केवळ 14 धावा करता आल्या. कॅप्टन गिलची बॅटही आज शांत राहिली. त्याला केवळ 13 धावा करता आल्या.
Innings Break!#TeamIndia posted 167/6 on the board!
5⃣8⃣ for vice-captain @IamSanjuSamson
Some handy contributions from @IamShivamDube & @ParagRiyanOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/TZH0TNJcBQ#ZIMvIND pic.twitter.com/p5OEEx8z2a
— BCCI (@BCCI) July 14, 2024
पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट गमावल्या. यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी पदभार स्वीकारला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 65 धावांची भागीदारी झाली. मावुताने पंधराव्या षटकात परागला आपला बळी बनवले. 22 धावा करून तो बाद झाला. तर संजू सॅमसन 45 चेंडूत 58 धावांची तुफानी खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 39 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या खेळीदरम्यान एक चौकार आणि चार षटकार मारले.
18व्या षटकात सॅमसन बाद झाल्यानंतर संथ धावगतीमुळे एके काळी टीम इंडियाला दीडशे धावसंख्याही गाठता येणार नाही असे वाटत होते. शेवटच्या 2 षटकांमध्ये शिवम दुबे आणि रिंकू सिंगने फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 167 धावांपर्यंत नेली. 19व्या षटकात शिवम दुबेने 2 षटकार आणि 1 चौकार मारून एकूण 19 धावा काढल्या. दुबेने 12 चेंडूत 26 धावा तर रिंकू सिंगने 9 चेंडूत 15 धावांची छोटीशी खेळी केली. झिम्बाब्वेकडून मुझाराबानीने दोन तर रझा, रिचर्ड आणि मावुथा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





