IND W vs ZIM W : प्रतिका रावलचे शतक अन् शफाली वर्माचे वादळ; भारताचा पहिल्या वनडेत झिम्बाब्वेवर ९ गडी राखून एकतर्फी विजय
IND W vs ZIM W : भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करत १-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.

India Women Thrash Zimbabwe by 9 Wickets in 1st ODI : भारत दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेल्या झिम्बाब्वे महिला संघाविरुद्ध भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. टी-२० मालिकेत ३-० असा ऐतिहासिक व्हाईटवॉश दिल्यानंतर, भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही पाहुण्यांचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १९७ धावांवर गारद झाला. विजयासाठी मिळालेले १९८ धावांचे माफक आव्हान भारतीय महिला संघाने अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या दणदणीत विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
बिझाची अर्धशतकी झुंज; झिम्बाब्वेचा डाव १९७ धावांवर संपुष्टात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली; सलामीवीर फिरी अवघ्या एका धावेवर बाद झाली. त्यानंतर मुपाचिकवा (२५) आणि मुगेरी-तिरिपानो (२१) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. झिम्बाब्वेकडून बिलव्ड बिझाने एकाकी झुंज देत ९२ चेंडूंत ६२ धावांची संयमी खेळी साकारली. मधल्या फळीत शार्न मेयर्स ७ धावांवर माघारी परतली, तर अखेरीस मिचेल मावुंगाने २९ धावांचे योगदान दिल्याने झिम्बाब्वेला १९७ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे पाहुण्यांचा डाव ४९.५ षटकांत आटोपला.
मानधना-प्रतिकाची शतकी भागीदारी; विजयाचा पाया रचला –
𝟮𝟯𝗿𝗱 𝗢𝗰𝘁𝗼𝗯𝗲𝗿 𝟮𝟬𝟮𝟱: Maiden WC hundred 💯
𝟮𝟯𝗿𝗱 𝗢𝗰𝘁𝗼𝗯𝗲𝗿 𝟮𝟬𝟮𝟲: ODI Century No. 3️⃣🎥 A day to cherish for Pratika Rawal 🗓️ ✨
#TeamIndia | #INDvZIM | @mflone_ | @RawalPratika https://t.co/Zfn59RosNI
— BCCI Women (@BCCIWomen) October 23, 2026
प्रत्युत्तरात १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना आणि युवा खेळाडू प्रतिका रावल यांनी मैदानात तुफानी सुरुवात केली. या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत ९४ धावांची भक्कम भागीदारी उभारली. स्मृती मानधना ३४ चेंडूंत ३४ धावांची जलद खेळी करून बाद झाली. मात्र, तिच्या बाद होण्याने सामन्याच्या गतीवर कोणताही परिणाम झाला नाही; उलट भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर आणखी दबाव वाढवला.
प्रतिका रावलचे शानदार शतक; शफाली वर्माची तुफानी फटकेबाजी
Shafali Verma added finishing touches with flying 64*(33) 🚀
🔽 WATCH | #TeamIndia | #INDvZIM | @mflone_
https://t.co/FBMdCOnXPe
— BCCI Women (@BCCIWomen) October 23, 2026
स्मृती बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शफाली वर्मा हिने मैदानावर चौफेर फटकेबाजी सुरू केली. तिने अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद ६४ धावांची स्फोटक खेळी साकारली. दुसऱ्या टोकाला खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रतिका रावलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावत नाबाद १०० धावांची मॅचविनिंग खेळी केली. २०२५ च्या विश्वचषकात दुखापतीमुळे नॉकआऊट फेरी गमावणाऱ्या प्रतिकाने पुनरागमनात थेट शतक ठोकून स्वतःची गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. या दोघींच्या नाबाद शतकी भागीदारीच्या बळावर भारताने एकतर्फी विजय साकारला.





