IND vs ZIM 2nd T20 : भारताने झिम्बाब्वे विरुद्ध Toss जिंकला, कर्णधार गिलने घेतला ‘हा’ निर्णय…

IND vs ZIM 2nd T20 (Toss Update) : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. गेल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India won the toss and Elected to Bat) त्यामुळे झिम्बाब्वे संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागेल.
India won the toss and will bat first against Zimbabwe in the second T20I 🪙
Zimbabwe lead the five-match series 1-0.#ZIMvIND pic.twitter.com/sMZT6k3TGd
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 7, 2024
दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी चांगली झाली नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता आज रविवारी हरारे येथे उभय संघांमध्ये दुसरा सामना होत असून त्यात भारतीय संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. भारताला 2016 नंतर प्रथमच टी-20 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
Team India’s Victory Parade : ‘व्हिक्टरी परेड’ मुंबईला पडली महागात…
पहिल्या T20 मध्ये भारताचा पराभव..
पहिल्या T20 मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेने टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव केला होता. आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणारे अनेक खेळाडू या संघात होते. मात्र ते झिम्बाब्वेविरूध्दच्या पहिल्या सामन्यात संधी मिळूनही सपशेल अपयशी ठरले. पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेने प्रथम खेळून केवळ 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यंग टीम इंडिया अवघ्या 102 धावांत गडगडली.





