Team India’s Victory Parade : ‘व्हिक्टरी परेड’ मुंबईला पडली महागात…

Team India’s T20 World Cup victory Parade : भारतीय पुरूष क्रिकेट संघाने अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर यंदा झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद मिळवले. देशात परतल्यानंतर टीम इंडियाचे मोठ्या जल्लोषाच स्वागत करण्यात आले व त्यासाठी येथील मरीन ड्राईव्हवर खुल्या बसमध्ये विजयी परेड देखील काढण्यात आली. या विजयी परेडसाठी मुंबईकरांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती. मात्र विजयोत्सवासाठी आलेले चाहते आपला तब्बल ११ हजार किलो कचरा मात्र मरिने ड्राईव्हवरच सोडून गेल्याने, टीम इंडियाची ही व्हिक्टरी परेड मरिन ड्राईव्हसाठी मात्र जरा महागच पडली आहे.
टीम इंडिया 4 जुलै रोजी बार्बाडोसहून भारतात परतली. या दिवशी मुंबईत विजय परेडचे आयोजन करण्यात आले होते. विजय परेडनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) रात्रभर मरिन ड्राइव्हची स्वच्छता केली. सुमारे 100 कर्मचारी या साफसफाईत गुंतले होते. नरिमन पॉईंटपासून सुरू झालेली विजयी परेड वानखेडे स्टेडियमपर्यंत गेली. परेड पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. या परेडनंतर अनेक चाहत्यांनी आपल्या चप्पल, पाण्याच्या बॉटल्स रस्त्यावर सोडल्याचे दिसले. त्यामुळे, बीएमसी कर्मचाऱ्यांना साफसफाईसाठी संपूर्ण रात्र कष्ट घ्यावे लागले. जमा झालेला हा कचरा 2 मोठे डंपर आणि 5 पाच छोट्या जीपमध्ये भरून डंपिंग यार्डकडे नेण्यात आला.
Victory Parade : बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटींचा धनादेश सुपूर्द, विराट-रोहित झाले भावूक…
बीएमसीची समाजमाध्यमावर माहिती…
व्हिक्टरी परेडनंतर बीएमसीने समाजमाध्यमावरील आपल्या अधिकृत पेजवरून या स्वच्छात मोहीमेची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले, टीम इंडियाच्या भव्य स्वागतानंतर आणि गर्दी गायब झाल्यानंतर, बीएमसी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसरात रात्रभर एक विशेष स्वच्छता मोहीम राबवली.
🏆 टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात काल रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
🧹 स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राईव्ह… pic.twitter.com/dchm1MydKZ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2024
परिसराची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि फिरायला येणाऱ्या मुंबईकरांसाठी मरीन ड्राइव्ह पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्यात आली. बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहिमेदरम्यान दोन मोठे डंपर आणि पाच छोट्या जीपमध्ये भरून अतिरिक्त कचरा गोळा केला, अशी माहितीही देण्यात आली आहे.





