IND vs WI : वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराक्रम! कँपबेल-होपच्या शतकाने संपला ५१ वर्षांचा दुष्काळ

वेस्ट इंडिजचा 51 वर्षांचा दुष्काळ संपला –
यापूर्वी असा पराक्रम 1974 मध्ये बंगळुरू येथे 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात केला होता. त्या सामन्यात वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज गॉर्डन ग्रीनिज आणि क्लाइव्ह लॉयड यांनी भारताविरुद्ध शतके ठोकली होती. त्या वेळी वेस्ट इंडिज संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. आता, तब्बल अर्ध्या शतकानंतर कँपबेल आणि होप यांच्या जोडीने या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
कँपबेल-होप यांची शानदार शतकी खेळी –
Battled and fought with our best batting effort of the tour. #INDvWI | #MenInMaroon pic.twitter.com/WP33ScgY3S
— Windies Cricket (@windiescricket) October 13, 2025
जॉन कँपबेलने संयम आणि आक्रमकतेचा उत्कृष्ट समतोल राखत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक पूर्ण केले. दुसरीकडे, कर्णधार शाई होप याने एक टोक संभाळत स्थिर आणि शानदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर सातत्याने दबाव टाकला. या दोघांमध्ये तिसऱ्या गड्यासाठी 177 धावांची जबरदस्त भागीदारी झाली, ज्यामुळे वेस्टइंडीजला मजबूत धावसंख्येकडे वाटचाल करता आली.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला मिळाली मोठी जबाबदारी! ‘या’ संघाची सांभाळणार धुरा
वेस्ट इंडिजवर पराभवाचे सावट –
जॉन कँपबेल आणि शाई होप यांच्या शतकांनंतरही वेस्टइंडीज संघावर पराभवाचे सावट आहे. पहिल्या डावात 248 धावांवर सर्वबाद झालेल्या वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांत गारद झाला. ज्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य मिळाले असून भारतीय संघाने चौथ्या दिवसअखेर 1 बाद 63 धावा केल्या. आता भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी 58 धावांची गरज आहे. त्यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. यापूर्वी अहमदाबाद कसोटीत भारताने वेस्ट इंडिजला डाव आणि 140 धावांनी पराभूत केले होते.





