Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला मिळाली मोठी जबाबदारी! ‘या’ संघाची सांभाळणार धुरा

अंडर-१९ मधील दमदार कामगिरी –
वैभवने अंडर-१९ संघाकडून खेळताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केले. याच कामगिरीमुळे निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे गेले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युथ कसोटी सामन्यात त्याने ११३ धावांची खेळी केली, तर युथ एकदिवसीय मालिकेत १४३ धावांची दमदार खेळी साकारली. आता रणजी ट्रॉफीमधील पदार्पण त्याच्या कारकिर्दीतील नवे पर्व ठरू शकते. इतक्या कमी वयात उपकर्णधारपद मिळवणे हे त्याच्या प्रतिभा आणि समर्पणाचे द्योतक आहे. वैभवच्या या यशामुळे बिहार क्रिकेटसह भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
टीम इंडियासाठी संधी –
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
14-year-old Vaibhav Suryavanshi has been named Bihar’s vice-captain for the first two matches of the Ranji Trophy 2025/26! 🏏👌#VaibhavSuryavanshi #Bihar #RanjiTrophy #Sportskeeda pic.twitter.com/4W70jYc1Ow
— Sportskeeda (@Sportskeeda) October 13, 2025
रणजी ट्रॉफीमध्ये वैभवने जर अप्रतिम कामगिरी केली, तर भारतीय वरिष्ठ संघात प्रवेशाची दारे त्याच्यासाठी खुली होऊ शकतात. आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा आणि ३५ चेंडूंमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय फलंदाज म्हणून वैभवने नाव कमावले आहे. आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या (३० चेंडू) नावावर आहे.
हेही वाचा – IND W vs AUS W : एलिसा हीलीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! भारताचा सलग दुसरा पराभव
आयपीएलमधील चमकदार कामगिरी –
वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून आपला पहिला आयपीएल हंगाम खेळला. त्याने ७ सामन्यांत ३६च्या सरासरीने २५२ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक यांचा समावेश आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात तो खेळला तेव्हा त्याचे वय फक्त १४ वर्षे आणि २३ दिवस होते. वैभवने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत ५ सामन्यांत १०० धावा जमवल्या आहेत. लिस्ट-ए प्रकारात ६ सामन्यांत १३२ धावा, तर ८ टी-२० सामन्यांत २६५ धावा त्याच्या नावावर आहेत.
हेही वाचा – Team India : भारताचा मार्ग खडतर! सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं आहे समीकरण? जाणून घ्या
बिहार रणजी ट्रॉफी २०२५-२६ संघ:
पियूष कुमार सिंग, भास्कर दुबे, साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, अमोद यादव, नवाज खान, साकिब हुसैन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशु सिंग, खालिद आलम, सचिन कुमार





