IND vs SL T20 Series : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेला दुसरा धक्का, आता ‘हा’ गोलंदाज जखमी झाला दुखापतग्रस्त…

IND vs SL T20 Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात शनिवार 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी श्रीलंकेला दोन मोठे धक्के बसले. प्रथम संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमेरा बाहेर झाला. आता दुसरा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराही बाहेर झाला आहे. सरावादरम्यान तुषाराला दुखापत झाली, त्यामुळे त्यालाही टी-20 मालिकेतून बाहेर जावे लागले आहे. संघ व्यवस्थापक महिंदा हलंगोडा यांनी नुवानच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
संघ व्यवस्थापकाने ईएसपीएन क्रिकइन्फो (ESPN cricinfo) ला सांगितले की, नुवान तुषाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. तो उजव्या हाताने गोलंदाजी करत असला तरी दुखापत इतकी गंभीर होती की त्याला संघातून वगळावे लागले. संघ व्यवस्थापकाने सांगितले की, नुवान तुषारा बुधवारी रात्री क्षेत्ररक्षणाच्या सरावात दुखापतग्रस्त झाला. यापूर्वी बाहेर झालेल्या दुष्मंथा चमीराच्या जागी श्रीलंकेने असिथा फर्नांडोचा संघात समावेश केला आहे तर तुषाराच्या जागी आता दिलशान मदुशंकाला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, एकापाठोपाठ दोन्ही वेगवान गोलंदाज टी-20 मालिकेतून बाहेर झाल्याने हा श्रीलंका संघासाठी दुहेरी धक्का मानला जात आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही सोशल मीडियावर नुवानच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्याला क्षेत्ररक्षणादरम्यान डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.
🚨 Nuwan Thushara will not take part in the T20I series, as the player suffered an injury to his left thumb while fielding during practices last night.
A medical report obtained shows a fracture on the player’s left thumb.
Dilshan Madushanka comes into the squad as a… pic.twitter.com/6pq0CzRqy2
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 25, 2024
टी-20 नंतर खेळवली जाईल वनडे मालिका….
टी-20 नंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. प्रथम 27 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. टी-20 मालिकेतील तीनही सामने पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.
Paris Olympics 2024 (Archery) : भारतीय महिला तिरंदाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…
त्यानंतर 02 ऑगस्टपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 04 ऑगस्ट, रविवारी आणि त्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना 07 ऑगस्ट, बुधवारी खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने कोलंबोतील आर.प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील.





