IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Updated On:
IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

IND vs PAK Asia Cup 2025 Match : आशिया चषक २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्याने क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांकडून या सामन्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. याचा निषेध म्हणून भारतीय संघाने हा सामना खेळू नये, अशी मागणी सोशल मीडियावरून होत आहे. तरीही, भारतीय सरकार आणि बीसीसीआयने टीम इंडियाला सामना खेळण्यास परवानगी दिली आहे.

पाकिस्तानने जिंकली नाणेफेक –

आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक झाली असून, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सांगितले की, संघाने प्रथम गोलंदाजीचा विचार केला होता, त्यामुळे पाकिस्तानचा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला आहे. दुबईच्या खेळपट्टीवर स्पिनरांना फायदा होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : साहिबजादा फरहान, सॅम अयुब, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), फखर झमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाझ, मोहम्मद नवाझ, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद

हेही वाचा – IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संताप; टीव्ही फोडले, पुतळा जाळण्याचा प्रयत्न!

भारताची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

2026-10-07 22:06:36

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित

2026-10-07 18:15:03

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित