Sarfaraz Khan Reveals : “माझी पत्नी रडत होती अन् वडील…”, ड्रेसिंग रूम लीक प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालं होतं सर्फराझचं कुटुंब, ‘या’ एका व्यक्तीने दिला आधार!
Sarfaraz Khan Reveals About Allegations : सर्फराझ खानने सांगितले की, भारतीय ड्रेसिंग रूममधून माहिती लीक केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर आणि कुटुंबावर काय परिणाम झाला होता.

Sarfaraz Khan reveals how dressing room leak allegations : टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराझ खानने ड्रेसिंग रूममधील माहिती लीक केल्याच्या आरोपांमुळे झालेल्या त्रासावर पहिल्यांदाच खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, या आरोपांमुळे त्याच्या आणि कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सर्फराझवर हे गंभीर आरोप झाले होते. या घटनेमुळे आपल्याला प्रचंड दुःख झालेच, परंतु आपल्या आई-वडिलांना आणि पत्नीला याचा मोठा मानसिक धक्का बसल्याची खंत सर्फराझने व्यक्त केली.
संकटकाळात गौतम गंभीर यांचा सर्वात आधी फोन –
आकाश चोप्राच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सर्फराझने सांगितले की, आरोपांनंतर मला माझा फोन बंद ठेवावा लागला होता. मात्र, दोन दिवसांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्वात आधी मला फोन करून धीर दिला. या सर्व निरर्थक गोष्टी असून अशा राजकारणात न पडता केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला गंभीर यांनी दिल्याचे सरफराजने नमूद केले.
वडिलांशी संवाद साधत गंभीर यांनी दिला आधार – सर्फराझ खान
🔴DRESSING ROOM NEWS CONTROVERSY: GAMBHIR CALLED SARFARAZ PERSONALLY 🤯
🎙️: After allegations that Sarfaraz Khan leaked dressing-room news, he was under a lot of stress. Gautam Gambhir personally called him and advised him not to get involved in unnecessary politics and to focus only on his cricket.
Gambhir also spoke to Sarfaraz’s father and reassured his family during the difficult time. ❤️👏
— Sam (@cricsam02) November 20, 2026
सर्फराझने पुढे सांगितले की, माझ्या वडिलांना (नौशाद) खूप दुःख झाले आहे आणि माझी पत्नीही सतत रडत असल्याचे मी गंभीर सरांना सांगितले. यानंतर गंभीर यांनी थेट माझ्या वडिलांशी फोनवर संवाद साधला. अशा अफवांकडे लक्ष देणे थांबवून सर्फराझला मुक्तपणे क्रिकेट खेळू द्या, तो एक उत्तम खेळाडू आहे आणि कोणत्याही मदतीची गरज भासल्यास थेट मला फोन करा, असा विश्वास गंभीर यांनी कुटुंबाला दिला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तणावामुळे उठले होते वादळ –
Sarfaraz Khan says he’d just landed when messages about the dressing-room leak allegation started coming in. Hearing him explain how much it hurt gives you a sense of what it’s like to be at the centre of a story you didn’t get to tell.
Credit to Aakash Chopra
https://t.co/p2vcN7pOTm#SarfarazKhan #TeamIndia #BorderGavaskarTrophy #IndianCricket #TestCricket #Cricket
— Professor Grok (@Professor_Grok) November 21, 2026
मेलबर्नमधील चौथ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर संघाच्या कामगिरीवर नाराज असल्याच्या आणि त्यांनी खेळाडूंना खडसावल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या. यावरून भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती आणि त्याचे खापर सर्फराझवर फोडण्यात आले होते. त्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्फराझ संघाचा भाग होता, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
संधी न मिळाल्याने सर्फराझने व्यक्त केली तीव्र निराशा –
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडून आणि फिटनेसमध्ये सुधारणा करूनही भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळत नसल्याने सर्फराझ सध्या अत्यंत निराश आहे. रेल्वेविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यानंतर बोलताना त्याने आपली हतबलता मांडली. खूप काही घडून गेले आहे आणि आता दररोज सकाळी उठल्यावर मी स्वतःलाच एक प्रश्न विचारतो की, “अखेर मी इतकी मेहनत का करावी?” अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली.





