IND vs NZ Final : अहमदाबादमध्ये छावणीचे स्वरूप! भारत-न्यूझीलंड फायनलसाठी ३ हजार पोलीस अन् ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा तैनात
IND vs NZ Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबाद शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

IND vs NZ Final Ahmedabad Police Security : टी-२० विश्वचषक २०२६च्या भारत-न्यूझीलंड या महामुकाबल्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबाद शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी ३,००० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि १,००० होमगार्ड्स मैदानात आणि परिसरात तैनात राहतील.
अतिआधुनिक सुरक्षा आणि ड्रोनवर नजर –
मैदानाबाहेरील आणि आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी स्टेडियमच्या परिसरात तीन अँटी ड्रोन सिस्टम बसवण्यात आल्या आहेत. तसेच, संशयास्पद वस्तूंच्या तपासणीसाठी आठ बॉम्ब शोधक आणि नाशक पथके (BDDS) तैनात करण्यात आली असून, शनिवारीच या व्यवस्थेची तालीम (रिहर्सल) पूर्ण करण्यात आली आहे.
गर्दी नियंत्रणासाठी ‘होल्डिंग एरिया’ –
#WATCH | #INDvNZ #ICCT20WorldCupfinal | Ahmedabad, Gujarat: Joint CP Neeraj Kumar Badgujar says, “…The stadium will be almost full. We have made all preparations. A heavy Police deployment has been made. More than 4500 staff, including Police officers, personnel and Home Guard,… pic.twitter.com/quGoYVPdI5
— ANI (@ANI) March 8, 2026
प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आणि कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रथमच विशेष ‘होल्डिंग एरिया’ संकल्पना राबवण्यात येत आहे. गेट नंबर १ आणि गेट नंबर २ जवळ हे क्षेत्र तयार करण्यात आले असून, अचानक गर्दी वाढल्यास तिथे प्रेक्षकांना नियंत्रित केले जाईल. तसेच, महिला प्रेक्षकांच्या तपासणीसाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना –
She Protects While You Cheer!
Our women police proudly serve at the #T20WorldCup Final, Ahemdabad. Salute to their dedication. 🇮🇳#GujaratPolice #WomensDay pic.twitter.com/dEfgEDbZnB
— Gujarat Police (@GujaratPolice) March 8, 2026
- वाहतूक कोंडी टाळा: पोलिसांनी प्रेक्षकांना विनंती केली आहे की, स्टेडियमवर येण्यासाठी बस किंवा मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
- काळ्या बाजारावर नजर: तिकिटांच्या काळाबाजाराबाबत (ब्लॅक मार्केटिंग) पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. अशी कोणतीही कृती आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





