IND vs NZ 3rd Test (Day 3) : भारतासमोर विजयासाठी 147 धावांचेे आव्हान…

IND vs NZ 3rd Test (Day 3) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 174 धावांत गारद झाला, त्यानंतर टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
न्यूझीलंडसाठी दुसऱ्या डावात विल यंगने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावांची सर्वात मोठी खेळी केली. संघाचे एकूण 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. या डावात न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या दबावाखाली दिसले.
भारताकङून गोलंदाजीत रविंद्र जडेजानं सर्वाधिक 5 बळी घेतले.याशिवाय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. उर्वरित एक यश फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि एक वेगवान गोलंदाज आकाशदीप यांना मिळाले.
IND vs NZ 3rd Test : जडेजा-सुंदरची चमकदार कामगिरी, न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत आटोपला….
दरम्यान,मुंबई कसोटीचा आज फक्त तिसरा दिवस असून सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच अपेक्षित आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या कीवी (NZ) संघाचा पहिला ङाव पहिल्याच दिवशी 235 धावसंख्येवरच संपला.त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला ङाव 263 धावांवर संपुष्टात आला आणि दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने दुस-या दिवसअखेर 9 बाद 171 धावा केल्या होत्या.
त्यानंतर आज तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाने न्यूझीलंडला 174 धावांवर ऑलआउट केले.त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या दिवशीच मुंबई कसोटीचा निकाल समोर येईल, अशी अपेक्षा आहे.





