Team India Champion : अहमदाबादमध्ये फडकला तिरंगा! ‘या’ ५ योद्ध्यांनी किवींना चारली धूळ; टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा ठरली जगज्जेती!
Team India Champion : या विजेतेपदाचे टॉप-५ शिल्पकार कोण होते? याबाबत जाणून घेऊया.

Five players played an important role in making Team India champion : टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विक्रमी तिसऱ्यां विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर विशाल लक्ष्याचा यशस्वी बचाव करताना न्यूझीलंडच्या संघाला १५९ धावांत गारद सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर विजयाची मोहोर उमटवली. या विजेतेपदाचे टॉप-५ शिल्पकार कोण होते? याबाबत जाणून घेऊया.
१. संजू सॅमसन: धावांचा झंझावात
3️⃣2️⃣1️⃣ RUNS 🔥
3️⃣ FIFTIES 👏
8️⃣0️⃣.2️⃣5️⃣ AVERAGE ✨A performance for the ages from SANJU SAMSON 🫡#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZ | @IamSanjuSamson pic.twitter.com/oUDtppO3Mv
— BCCI (@BCCI) March 8, 2026
संजू सॅमसनने या स्पर्धेत मिळालेल्या संधीचे सोने करत सलग तिसरे अर्धशतक झळकावले. अंतिम सामन्यात त्याने ८९ धावांची वादळी खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचे शतक थोडक्यात हुकले असले तरी, त्याच्या या खेळीने भारताला विशाल धावसंख्या उभारून दिली.
२. इशान किशन: मधल्या फळीचा आधार
5⃣4⃣ runs off 2⃣5⃣ deliveries 💥💥
Ishan Kishan was in some mood tonight 👌👌
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZ | @ishankishan51 pic.twitter.com/ASrZ2riGcg
— BCCI (@BCCI) March 8, 2026
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशनने संजू सॅमसनसोबत मिळून १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. इशानने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
३. शिवम दुबे: फिनिशरचा अवतार
4⃣, 6⃣, 6⃣, 4⃣, 4⃣ 🤯
How about that for a last-over finish by Shivam Dube 🔥🔥
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZ | @IamShivamDube pic.twitter.com/cdgrWhJAfn
— BCCI (@BCCI) March 8, 2026
अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने आपल्या स्फोटक फलंदाजीने भारताची धावसंख्या २५० च्या पार नेली. त्याने केवळ ८ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद २६ धावा कुटल्या.
४. जसप्रीत बुमराह: किवींचा कर्दनकाळ
The man for the 𝗕𝗜𝗚 𝗢𝗖𝗖𝗔𝗦𝗜𝗢𝗡 🫡
The ever-dependable Jasprit Bumrah clinches the Player of the Match award in the #T20WorldCup #Final 👏🙌
Scorecard ▶️ https://t.co/5LXBod8bl1#TeamIndia | #MenInBlue | #INDvNZ | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/KXGVTV1KNT
— BCCI (@BCCI) March 8, 2026
विशाल धावसंख्येचा बचाव करताना जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. बुमराहने ४ षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये केवळ १५ धावा खर्च करून न्यूझीलंडचे ४ महत्त्वाचे फलंदाज टिपले आणि विजयाचा मार्ग सुकर केला.
५. अक्षर पटेल: गोलंदाजीचा ‘अनसंग हिरो’
Leg stump rattled \|/ 🔥
Vice-captain Axar Patel castles Glenn Phillips#TeamIndia have Wicket No. 3⃣ 👏
Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZ | @akshar2026 pic.twitter.com/dwcl1AIaQH
— BCCI (@BCCI) March 8, 2026
फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी अक्षर पटेलने गोलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवली. त्याने सुरुवातीलाच फिन ॲलेनला ९ धावांवर बाद केले आणि त्यानंतर ग्लेन फिलिप्सची दांडी गुल केली. अक्षरने या महत्त्वपूर्ण सामन्यात ३ गडी बाद करत न्यूझीलंडच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले.





