IND vs NZ : टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर सूर्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, पाहा VIDEO
IND vs NZ : धावांच्या फरकाने विचार केल्यास, टी-२० विश्वचषक फायनलमधील हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

IND vs NZ Final Suryakumar Yadav pays respect to pitch : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा डाव १९ व्या षटकात १५९ धावांवर आटोपला. धावांच्या फरकाने विचार केल्यास, टी-२० विश्वचषक फायनलमधील हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयानंतर सूर्याच्या एका कृतीने सर्वांच लक्ष वेधलं.
विजयाचे शिल्पकार आणि जल्लोष –
भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत या विजयाचा पाया रचला. त्यानंतर गोलंदाजीत अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या जोडीने मिळून ७ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. १८ व्या षटकात बुमराहने मिचेल सँटनरला बाद करून नववी विकेट मिळवली, तर १९ व्या षटकात अभिषेक शर्माने शेवटचा बळी घेत न्यूझीलंडचा डाव संपवला. न्यूझीलंड सर्वबाद होताच अहमदाबादच्या मैदानावर विजयाचा एकच जल्लोष सुरू झाला.
सूर्यकुमार यादवने जिंकली सर्वांची मने –
PICTURE OF THE DAY ❤️🏆
Feeling 🥹#SuryakumarYadav #INDvsNZ pic.twitter.com/WnTNhy1kCZ
— RoMan (@SkyXRohit1) March 8, 2026
भारत के कप्तान #SuryaKumarYadav
ने टी20 वर्ल्ड कप जीतने के बाद नरेंद्र मोदी स्टेडियम की मिट्टी को माथे से लगाया। उनका ये भावुक पल सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। #T20WorldCup2026final pic.twitter.com/ae2JaYgn2c— NISHANT (@AnkitYadav10742) March 8, 2026
विजयानंतर सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारून जल्लोष करत असताना, कर्णधार सूर्यकुमार यादवने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सूर्या अचानक विजयी घोळक्यातून बाहेर आला आणि त्याने खाली वाकून खेळपट्टीवर हात फिरवला. अहमदाबादच्या पिचची माती त्याने आदराने आपल्या डोक्याला लावली आणि त्या खेळपट्टीचे आभार मानले.
रोहित शर्माने २०२४ मध्ये केलं होतं असं –
History Repeated History Defeated…..
Love the Mother Soil❤️🏆#SuryakumarYadav #INDvsNZ pic.twitter.com/HUaMI5vQnA
— RoMan (@SkyXRohit1) March 8, 2026
२०२४ च्या बार्बाडोसमधील विजयानंतर रोहित शर्माने खेळपट्टीच्या मातीची चव चाखली होती, तर आता सूर्याने खेळपट्टीची माती डोक्याला लावत मैदानाचा सन्मान केला आहे. सूर्याच्या या कृतीने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.





