IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी मुंबईत खेळली जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला पहिल्या डावात 65.4 षटकात 235 धावांत गुंडाळले आहे. या दरम्यान भारताकडून गोलदांजीत रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी सर्वाेकृष्ट गोलंदाजी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाला 15 धावसंख्येवर पहिला धक्का बसला. आकाश दीपने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर कर्णधार टॉम लॅथमने विल यंगसोबत 44 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वॉशिंग्टन सुंदरने मोडली. त्याने लॅथमला क्लीन बोल्ड केले. लॅथम 28 धावा करून बाद झाला. यानंतर सुंदरने रचिन रवींद्रलाही क्लीन बोल्ड केले. त्याला पाच धावा करता आल्या. सुंदरने सलग तीन डावात तिसऱ्यांदा रचिनला बाद केले.
रचिन बाद झाल्यानंतर यंगने डॅरिल मिशेलसोबत चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान यंगने कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी रवींद्र जडेजाने मोडली. जडेजाने किवी संघाच्या डावाच्या 44व्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने प्रथम यंगला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर टॉम ब्लंडेल याला क्लीन बोल्ड केलं. यंगने 71 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी ब्लंडेलला खातेही उघडता आले नाही. यानंतर जडेजाने ग्लेन फिलिप्सलाही क्लीन बोल्ड केले. त्याला 17 धावा करता आल्या.
Innings Break!
Solid bowling display from #TeamIndia! 💪 💪
5⃣ wickets for Ravindra Jadeja
4⃣ wickets for Wahsington Sundar
1⃣ wicket for Akash DeepScorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @Sundarwashi5 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/H91914qtgt
— BCCI (@BCCI) November 1, 2024
यानंतर जडेजाने या डावात दुसऱ्यांदा एका षटकात दोन बळी घेतले. त्याने किवी संघाच्या डावाच्या 61व्या षटकात ईश सोधी आणि मॅट हेन्री यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सोढी एलबीडब्ल्यू आऊट झाला, तर हेन्री क्लीन बोल्ड झाला. सोधीने सात धावा केल्या, तर हेन्रीला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर उर्वरित काम वॉशिंग्टन सुंदरने केले. त्याने डॅरिल मिशेल आणि एजाज पटेल यांना बाद करून न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आणला.
IND vs NZ 3rd Test : जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाही? BCCI नं धक्कादायक अपडेट केले जारी…
किवीजकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 82 धावा केल्या. याशिवाय विल यंगने 71 धावांची खेळी केली. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि वॉशिंग्टन सुंदरने चार विकेट घेतल्या. याशिवाय आकाश दीपला एक विकेट मिळाली.