IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटी दरम्यान स्टेडियमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, पाणी उपलब्ध नसल्याने संतापले चाहते..! जाणून घ्या, नेमकं काय घडलं….watch video

IND vs NZ 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जात आहे. एमसीए क्रिकेट स्टेडियमवर (MCA Intl Stadium, Gahunje) भारतीय गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले, मात्र स्टेडियममधील पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेने सर्वांनाच त्रास झाला. मैदानावरील चाहते पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसत होते. परिणामी संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर एमसीए स्टेडियममधील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. काही चाहत्यांनी फोटोही शेअर केले, ज्यामध्ये पाण्याची वाट पाहत असताना लोकांची गर्दी दिसते. एका ट्विटनुसार, विक्रेते स्टेडियमजवळ 100 मिली पाण्याच्या बाटल्या 80 रुपयांना विकताना दिसले.
वास्तविक, आज पुण्यातील तापमान चांगलेच तापले होते. तरी देखील सुमारे 18 हजार चाहत्यांनी मैदानावर हजेरी लावली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये असलेल्या स्टॅन्डच्या मोठ्या भागावर छत नसल्याने उन्हात बसलेल्या चाहत्यांनी पाण्याच्या बूथकडे धाव घेतली. मात्र बुथवर पाणीच उपलब्ध नसल्याने चाहते संतापले. दरम्यान, बुथवर सातत्याने गर्दी वाढत होती. मात्र तरीही पाणी पोहचण्यास वेळ लागला. यावेळी चाहत्यांनी असोसिएशनच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळानंतर पाणी उपलब्ध झाल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप सुरु केले.
Shame on MCA for poor water management in IND vs NZ #MCA pune pic.twitter.com/8ysRoOL7WK
— Pratik Patil (@Patilp6969) October 24, 2024
पाणी न भेटल्यानं चाहते संतापले….
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर होता. मात्र, रोहितच्या पलटणला चिअर करण्यासाठी आलेल्या चाहत्यांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये सुमारे 2 तास पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते, त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली परिणामी कडाक्याच्या उन्हात पाण्याअभावी चाहत्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले, असे असल्याचे चाहत्यांनी ट्विट केले आहे.
Fans protest the lack of drinking water facilities in MCA stadium under the scorching Pune heat.#INDvsNZL pic.twitter.com/MxiyEa0Epp
— Sarcasm (@sarcastic_us) October 24, 2024
एका चाहत्याने ट्विट केले की, “पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये पाणी नाही. ही परिस्थिती ऑक्टोबर महिन्यात आहे, जेव्हा उष्णतेचा प्रकोप सुरू होतो. चाहत्यांना मूलभूत सुविधा मिळत नसताना स्टेडियम सुधारण्यात काय अर्थ आहे? लज्जास्पद.”
NO WATER in the MCA Stadium at Pune. That too in the month of October when there’s scorching HEAT.
What’s the point of boasting about stadiums when fans can’t get basic facilities? SHAME! https://t.co/re4GNb7uvF
— Sameer Allana (@HitmanCricket) October 24, 2024
पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल, दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले की, “एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये 2 तास पाणी उपलब्ध नव्हते. स्टेडियममध्ये विक्रेते 100 मिली पाण्याच्या बाटल्या 80 रुपयांना विकताना दिसत होते. ट्विटनुसार, पाण्याअभावी चार वृद्ध बेशुद्ध पडल्याची घटना घडली.”
एका चाहत्याने लिहिले की, “सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची अवस्था बघा, जे स्टेडियममध्ये मूलभूत सुविधाही देऊ शकत नाहीत. एमसीए स्टेडियममध्ये पाणी उपलब्ध नसल्याने चाहत्यांनी असोसिएशनच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Look at the richest board of cricket who can’t provide basic facilities in the stadium. fans are protesting against not having sufficient drinking water facilities in the MCA stadium. #INDvNZ pic.twitter.com/JmAzzxV5Sn
— Dev Sharma (@SharmaDev90) October 24, 2024
पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर …
पुणे कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर होता. पहिल्या डावात 259 धावा करून न्यूझीलंडचा संपूर्ण संघ गडगडला. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फिरत्या चेंडूने कहर केला आणि 7 किवी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुंदरशिवाय आर अश्विननेही तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या.
न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 76 धावा केल्या, तर रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारताने रोहित शर्माच्या रूपाने पहिली विकेट देखील गमावली. भारताने पहिल्या दिवशी 1 बाद 16 धावा केल्या असून न्यूझीलंडकडे अजूनही 243 धावांची आघाडी शिल्लक आहे.





