IND vs ENG : पतौडी ट्रॉफीला अलविदा! भारत-इंग्लंड कसोटी मालिका आता ‘या’ नावाने ओळखली जाणार

IND vs ENG Test Series name change : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे. ही मालिका पूर्वी “पतौडी ट्रॉफी” म्हणून ओळखली जात होती, परंतु आता तिचे नाव बदलण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या ट्रॉफीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ईसीबीने मार्चमध्ये पतौडी कुटुंबाला पत्र लिहून कळवले की ते आता ही ट्रॉफी निवृत्त करू इच्छितात.
बीबीसी स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, भारत आणि इंग्लंडमधील ही कसोटी मालिका आता “तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी” म्हणून ओळखली जाईल. या मालिकेचा पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल. मालिका सुरू होण्यापूर्वी ईसीबी अधिकृतपणे या ट्रॉफीचे नवीन नाव जाहीर करेल.
मालिकेचे बदलले जाणार नाव –
🚨 TENDULKAR-ANDERSON TROPHY 🚨
– India & England Test series will be played for a new Trophy named after Sachin Tendulkar & James Anderson. [BBC Sport] pic.twitter.com/dxqOYfYp8W
— Johns. (@CricCrazyJohns) June 5, 2025
आता या ऐतिहासिक कसोटी मालिकेला “तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी” असे नवीन नाव देण्यात येणार आहे. क्रिकेट जगतातील दोन महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या सन्मानार्थ हे नाव ठेवण्यात आले आहे. हा निर्णय क्रिकेटप्रेमींसाठी एक खास भेट मानला जात आहे.
हेही वाचा – Shubman Gill Statement : ‘त्यांची कमी भरून काढणे कठीण पण हे…’, विराट-रोहितबद्दल गिल काय म्हणाला?
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
हेही वाचा – French Open 2025 : गॉफचा धमाका, सबालेन्काचा दबदबा; दोघींमध्ये रंगणार फायनलचा थरार
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
२०-२४ जून २०२५ – पहिली कसोटी, हेडिंग्ले
२-६ जुलै २०२५ – दुसरी कसोटी, एजबॅस्टन
१०-१४ जुलै २०२५ – तिसरी कसोटी, लॉर्ड्स
२३-२७ जुलै २०२५ – चौथी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड
३१ जुलै-४ ऑगस्ट २०२५ – पाचवी कसोटी, द ओव्हल





