Mukesh Kumar : ‘कर्माची फळं नक्की मिळणार…”, मुकेश कुमारचा गंभीर-हर्षितवर निशाणा? व्हायरल पोस्टने वेधलं लक्ष

Mukesh Kumar’s Cryptic Post Sparks Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरु होण्यास फक्त एक दिवस बाकी आहे. अशा वेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्या गूढ सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. २०२४ मध्ये भारताकडून शेवटची कसोटी खेळलेल्या मुकेश कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठीच्या वरिष्ठ संघात निवड झाली नव्हती.
गंभीर आणि हर्षितवर निशाणा साधल्याचे चाहत्यांचे मत –
मात्र, त्याने इंडिया अ संघाकडून इथे एक सामना खेळला. इंडिया अ संघासाठी एका सामन्यात मुकेशने तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही आणि त्याने अंतर्गत सराव सामनाही खेळला नाही. आता मुकेश कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कर्माशी संबंधित एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. चाहते या पोस्टला गौतम गंभीर आणि हर्षित राणा यांच्यावर निशाणा साधणारी म्हणून पाहत आहेत.
काय आहे मुकेश कुमारची पोस्ट?
मुकेश कुमारने त्यांच्या गूढ पोस्टमध्ये लिहिले, “कर्म आपला वेळ देत असते. तुम्हाला नेहमी सावध राहावे लागेल. कर्म माफ करत नाही आणि त्याचे फळ नेहमी मिळते.” मुकेश कुमारच्या या पोस्टवर चाहते विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
You can really feel Mukesh Kumar’s frustration. He’s toiled hard, picked up around 44 wickets in his last 11 domestic games. Meanwhile, someone like Harshit Rana, with barely 13 domestic matches under his belt, gets retained in the squad.
It makes you wonder what’s the point of… pic.twitter.com/2xXJnfvMxh
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) June 18, 2025
मुकेश कुमारच्या पोस्टचे कारण काय?
Exactly! He was up in the packing order before Harshit Rana. Since Rana is gautam gambhir’s favorite, so he dropped Mukesh.
— Khem Raj Thakur (@Raj11_Speaks) June 18, 2025
खरंतर, मालिका सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीरचा आवडता मानला जाणारा हर्षित राणाची अचानक भारतीय संघात निवड झाली. राणाने इंग्लंड लायन्सविरुद्ध एक सामना खेळला, ज्यात त्यांनी एक विकेट्स घेतली होती, तर अंतर्गत सराव सामन्यातही त्याची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली नाही. हर्षित राणाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले होते, जिथे त्याला दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा – Joe Root : ‘मी कधीच विराटचा…’, कसोटी मालिकेपूर्वी जो रुटचं कोहलीबाबत मोठं वक्तव्य
याशिवाय, त्याने एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्येही पदार्पण केले आहे. राणा २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघाचाही भाग होता. तसेच मुकेशने भारताचे प्रतिनिधित्व तीन कसोटी सामन्यांत केले असून, त्याने यात ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या कसोटी मालिकेदरम्यान पदार्पण केले होते आणि गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरगुती मालिकेचाही तो भाग होता.





