IND vs ENG : साई सुदर्शनने केली इतिहासाची पुनरावृत्ती, ३८ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुन्हा ‘असं’ घडलं

IND vs ENG Sai Sudharsan’s Test debut at Headingley : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. या सामन्यातून भारतीय संघात एका नव्या खेळाडूचा प्रवेशही झाला आहे. २२ वर्षीय युवा फलंदाज साई सुदर्शनने या सामन्यासह कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुदर्शनच्या पदार्पणासह भारतीय क्रिकेटमध्ये ३८ वर्षांपूर्वी घडलेली एक खास गोष्ट पुन्हा अनुभवायला मिळाली. ती काय आहे? जाणून घेऊया.
हेडिंग्ले कसोटी सामन्यात भारतीय संघात करुण नायरच्या पुनरागमनासह डावखुरा फलंदाज साई सुदर्शनलाही संधी मिळाली. साई सुदर्शन या सामन्यात खेळण्याची शक्यता निश्चित मानली जात होती. देशांतर्गत क्रिकेट, त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इंडिया ‘अ’ संघासाठी आणि नंतर आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करत सुदर्शनने सर्वांना प्रभावित केले होते.
३८ वर्षांनंतर भारतीय संघात असे पदार्पण –
We are set for the series opener 👌 👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/xAbVDUsUdp
— BCCI (@BCCI) June 20, 2025
सुदर्शनच्या पदार्पणाबाबत प्रचंड उत्सुकता होती आणि जेव्हा भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा याने त्यांना टेस्ट कॅप प्रदान केली, तेव्हा त्यांचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेले. सुदर्शन हा भारतीय संघाचा ३१७ वा कसोटी क्रिकेटर बनला आहे. परंतु त्यांच्या पदार्पणात एक खास बाब होती, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा – IND vs ENG : साई सुदर्शनच्या पदार्पणाचा अजब योगायोग; द्रविड, गांगुली, कोहलीच्या पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज!
खरं तर, ३८ वर्षांनंतर भारतीय संघात टॉप ऑर्डरमध्ये (पहिल्या तीन फलंदाजांमध्ये) अशा खेळाडूचं पदार्पण झाले, ज्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली सरासरी ४० पेक्षा कमी आहे. सुदर्शनची कसोटी पदार्पणापूर्वी सरासरी ३९.९३ आहे. सुदर्शनपूर्वी १९८७-८८ मध्ये डब्ल्यू. व्ही. रमनचं भारतीय संघात पदार्पण झाले तेव्हा त्यांची सरासरी देखील ४० पेक्षा कमी होती. रमन यांनी सलामीवीर म्हणून पदार्पण केले होते.
हेही वाचा – IND vs ENG : राहुल-यशस्वीने लीड्सवर रचला नवा इतिहास, मोडला ३९ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम
सुदर्शनने पदार्पणाच्या सामन्यात केली निराशा –
जिथपर्यंत पदार्पणाचा प्रश्न आहे, तिथे सुदर्शनची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. लीड्स कसोटीत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि पहिल्या सत्रात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जोडीने शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी ९१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल बाद झाल्यावर सुदर्शन मैदानावर उतरला. सर्वांचे लक्ष त्याच्यावर होते, पण त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या ४ चेंडू खेळून तो खाते न उघडताच तंबूत परतला.





