Shubman Gill Statement : ‘त्यांची कमी भरून काढणे कठीण पण हे…’, विराट-रोहितबद्दल गिल काय म्हणाला?

Shubman Gill Statement on Virat-Rohit Absence in IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची रोमांचक कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघातील काही खेळाडू या मालिकेसाठी आधीच इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत आणि इंग्लंड लायन्सविरुद्ध इंडिया अ संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर काही भारतीय खेळाडू आता कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गंभीरसह इंग्लंडला रवाना होतील.
इग्लंडला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कसोटीचा शुबमन गिल दोघांनीही मुंबईत पत्रकार परिषदेत भाग घेतला. यादरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा त्याने एक मोठे विधान केले.
Shubman Gill takes charge as India’s new Test captain 🇮🇳
Gautam Gambhir joins as head coach 🎯
Ready for the England challenge! 🏏#ENGvIND #ShubmanGill #GautamGambhir #TestCricket pic.twitter.com/iG0pywtCdL
— Reenu yadav (@reenu26451) June 5, 2025
रोहित-विराटच्या अनुपस्थितीबद्दल गिल काय म्हणाला?
भारताच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलने विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल म्हटले की, ‘प्रत्येक दौऱ्यात नेहमीच दबाव असतो. इतके दिवस खेळलेल्या आणि अनेक वेळा जिंकलेल्या दोन अतिशय अनुभवी खेळाडूंची जागा भरणे खूप कठीण आहे. पण हा वेगळ्या प्रकारचा दबाव नाही, आपल्या सर्व खेळाडूंना त्याची सवय झाली आहे.’
हेही वाचा – Bengaluru Stampede : ‘जीवापेक्षा काहीही मोठं नाही…’, चेंगराचेंगरीच्या घटनेवर गौतम गंभीर संतप्त
इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट-रोहितने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. विराटने भारतासाठी १२३ कसोटी सामने खेळले आहेत, तर रोहितने ६७ कसोटी सामने खेळले आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर बीसीसीआयने तरुण कर्णधार शुबमन गिलची निवड केली. परंतु, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे देखील शर्यतीत होते. ऋषभ पंतला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.





