कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवी भर! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार IND vs ENG मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रत्येक कसोटी मालिका आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी म्हणून ओळखली जाईल. सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांनी या नव्या ट्रॉफीचे अनावरण केले आहे. याशिवाय, पतौडी कुटुंबाच्या सन्मानार्थ ही ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधाराला पतौडी पदक प्रदान केले जाईल, याचीही अधिकृत पुष्टी झाली आहे. ही ट्रॉफी केवळ इंग्लंडमध्येच नव्हे, तर भारतातही याच नावाने ओळखली जाईल आणि विजेत्या कर्णधाराला पतौडी पदक मिळेल.
The two most capped players in Test cricket history…
Now with their very own trophy 😍🏆 pic.twitter.com/ovhFLETR4S
— England Cricket (@englandcricket) June 19, 2025
ईसीबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, “अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या संयुक्त उपक्रमातून निर्माण झालेली आहे. यापुढे इंग्लंड आणि भारत यांच्यातील सर्व कसोटी मालिकांचे प्रतिनिधित्व ही ट्रॉफी करेल. यापूर्वी इंग्लंडमधील कसोटी मालिका पतौडी ट्रॉफी आणि भारतातील कसोटी मालिका अँथनी डी मेलो ट्रॉफी या नावांनी ओळखली जात होती. मात्र, आता दोन्ही देशांतील मालिका अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाईल.”
हेही वाचा – Anaya Bangar : अनाया बांगरची क्रिकेटमध्ये कमबॅकची मागणी, आयसीसी-बीसीसीआयसमोर मोठे आव्हान!
माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण – जेम्स अँडरसन
🥁 Introducing…
The Anderson–Tendulkar Trophy 🏆
— England Cricket (@englandcricket) June 19, 2025
या प्रसंगी जेम्स अँडरसन म्हणाला, “माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण या प्रतिष्ठित मालिकेचे नाव सचिन आणि माझ्या नावावर ठेवण्यात आले आहे. आमच्या दोन्ही देशांमधील स्पर्धा नेहमीच खास राहिली आहे, जी इतिहास, तीव्रता आणि अविस्मरणीय क्षणांनी परिपूर्ण आहे.”
हेही वाचा – IND vs ENG : हेडिंग्लेवर युवा टीम इंडियाची खरी कसोटी! या मैदानावर कसा आहे भारताचा रेकॉर्ड? जाणून घ्या
मी माझा पाया कसोटी क्रिकेटवर रचला- सचिन तेंडुलकर
दुसरीकडे, सचिन तेंडुलकर म्हणाले, “माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे जीवनाचे प्रतीक आहे. तुम्ही तुमचे सर्वोत्तम देता, आणि जर काही चुकीचे झाले तर ते तुम्हाला पुन्हा एकत्र येण्यासाठी, विचार करण्यासाठी, विसरण्यासाठी आणि पुनरागमनासाठी आणखी एक दिवस देते. हा खेळाचा सर्वोच्च प्रकार आहे, जो तुम्हाला सर्व अडथळ्यांनंतरही संयम, शिस्त आणि अनुकूलनशीलता शिकवतो. मी माझा पाया कसोटी क्रिकेटवर रचला आहे, कारण त्याने मला निराशेपासून विजयापर्यंत आणि आकांक्षेपासून परिपूर्णतेपर्यंत वाढताना पाहिले आहे.”





