IND vs ENG : हेडिंग्लेवर युवा टीम इंडियाची खरी कसोटी! या मैदानावर कसा आहे भारताचा रेकॉर्ड? जाणून घ्या

IND vs ENG Headingley Test Record : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जून रोजी लीड्स येथील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला विजय मिळवण्याची जबाबदारी युवा खेळाडूंवर असेल. हेडिंग्ले येथे भारतीय संघाचा इतिहास फारसा चांगला नाही. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घेऊया?
हेडिंग्ले कसोटीत भारताचा कसा आहे रेकॉर्ड –
इंग्लंडमधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर भारताने शेवटचा कसोटी सामना २००२ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्या सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय नोंदवला होता.
What are the three things you can think of..
..𝙒𝙝𝙚𝙣 𝙞𝙣 𝙀𝙣𝙜𝙡𝙖𝙣𝙙 🤔
Hear it from #TeamIndia 😎#ENGvIND pic.twitter.com/uJ52OJvi9B
— BCCI (@BCCI) June 18, 2025
या सामन्यात भारताची भिंत राहुल द्रविडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने १४८ धावांची शानदार खेळी केली होती. मात्र, त्या सामन्यानंतर भारतीय संघाला या मैदानावर पुन्हा विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भारताला २३ वर्षांनंतर विजय मिळवून देण्याची जबाबदारी कर्णधार शुबमन गिलच्या युवा संघावर आहे.
युवा खांद्यावर भारताच्या विजयाची जबाबदारी –
आता टीम इंडियाचं नेतृत्व युवा शुबमन गिलच्या हाती आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. संघात यशस्वी जैस्वाल, अर्शदीप सिंग, साई सुदर्शन आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारखे युवा खेळाडू सामील आहेत. या युवा खांद्यांवर भारताला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे. कार, भारतीय संघात जसप्रीत बुमराह आणि केएल राहुलसारखे मोजकेच अनुभवी खेळाडू आहेत.
हेही वाचा – Mukesh Kumar : ‘कर्माची फळं नक्की मिळणार…”, मुकेश कुमारचा गंभीर-हर्षितवर निशाणा? व्हायरल पोस्टने वेधलं लक्ष
भारत विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड कसोटी रेकॉर्ड –
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १३६ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी ३५ सामने भारताने जिंकले, तर ५१ सामने इंग्लंडने जिंकले. उर्वरित ५० सामने अनिर्णित (ड्रॉ) राहिले. अशा प्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे भारताविरुद्ध वर्चस्व पाहायला मिळाले आहे.





