IND vs ENG Test Series : जेम्स अँडरसन मोठ्या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर…

IND vs ENG Test Series : इंग्लंडचा ४१ वर्षांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन एका खास विक्रमाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३४२ डाव खेळणारा अँडरसनचे कसोटीत एकूण ६९५ बळी असून ७०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ५ बळींची गरज आहे.
अँडरसनकडे कसोटीत ७०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा विश्वविक्रम साकारण्याची संधी आहे. हा विक्रम भारतीय संघाविरुद्धच्याच मालिकेतच घडणार का हे पाहणे आनंददायी ठरणार आहे.
विशाखापट्टणम येथे झालेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना संपला आता या मालिकेत अद्याप तीन सामने बाकी आहेत. अँडरसनने २००३ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत बळी मिळाले नाहीत असे एकही वर्ष गेले नाही.
अँडरसनने २०२४ सालातही बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासू दरवर्षी बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वर्षाची सुरुवात असून पुढे बळींचा आणखी पल्ला गाठेल असेच चित्र दिसत आहे.





