IND vs ENG Test Series : इंग्लंड देऊ शकतो भारताला व्हाईट वाॅश – माॅंटी पानेसर

लंडन :- हैदराबाद कसोटीमध्ये ज्या पद्धतीने इंग्लंडने भारतावर बाजी पलटवली आणि सामना जिंकला ते पाहता, या पाच कसोटींच्या मालिकेत इंग्लंड भारताला ५-० असा व्हाईट वाॅश देऊ शकतो, असे प्रतिपादन इंग्लंडचा निवृत्त फिरकीपटू माॅंटी पानेसर (Monty Panesar) याने केले आहे. ओली पोप आणि नवोदित टॉम हार्टले यांची कामगिरी पाहता, ही गोष्ट अशक्य नाही, असेही पानेसर म्हणाला.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी पानेसर म्हणला की, जर पोप आणि हार्टले हैदराबादप्रमाणे संपूर्ण मालिकेत खेळत राहिले, तर इंग्लंड भारताचा सफाया करेल. या सामन्यात सामनावीर पोपने १९६ धावा केल्या, तर हार्टलेने दुसऱ्या डावात सात विकेट्स घेत आपल्या संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
पानेसर म्हणाला की, प्रत्येकाला वाटले होते की इंग्लंड १९० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर हरेल. हा इंग्लंडच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक होता आणि इंग्लंडने जवळपास विश्वचषक जिंकल्यासारखे वाटले. 10 वर्षांच्या कालावधीत घरच्या कसोटी सामन्यात भारताचा हा चौथा पराभव ठरला.
West Indies Cricket : शामार जोसेफ ठरु शकतो कसोटी क्रिकेटचा तारणहार, ‘स्टीव्ह-वॉ’ ने केले कौतुक…
२०१२-१३ नंतर भारतीय भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे लक्ष्य इंग्लंडचे असेल. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे २ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.





