Monty Panesar criticizes Shubman Gill : आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये एक धक्कादायक बदल पाहायला मिळाला. भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शुबमन गिलला केवळ उपकर्णधारपदावरूनच हटवण्यात आलेले नाही, तर त्याला थेट संघातूनच डच्चू देण्यात आला आहे. अशात इंग्लंडचे माजी खेळाडू मॉन्टी पानेसर याने गिलबद्दल परखड मत मांडले आहे. गिलच्या कामगिरीवर टीका आणि परखड मत – शुबमन गिल सध्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ही धुरा गिलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, त्याच्या नेतृत्वात भारताला अपेक्षित यश मिळाले नसल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने गिलच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गिल एक टॅलेंटेड पण ‘निष्काळजी’ खेळाडू – पानेसर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पानेसर म्हणाला, “विराट कोहलीची मैदानातील तीव्रता आणि आक्रमकता वेगळ्या उंचीची आहे, जी गिलमध्ये दिसत नाही. तो एक टॅलेंटेड पण ‘निष्काळजी’ खेळाडू आहे. खेळताना तो अनेकदा आळशी शॉट्स मारून बाद होतो. विराटची ऊर्जा तिन्ही फॉरमॅटमध्ये सारखीच असते, पण गिलला ते अद्याप जमलेले नाही. तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद भूषवणे हे त्याच्यासाठी झेपण्यापलीकडचे ओझे आहे.” हेही वाचा – Babar Azam : मैदानावर फ्लॉप अन् वादात टॉप! बाबरच्या एका ‘ऑटोग्राफ’मुळे पेटला नवा वाद; नेमकं प्रकरण काय? कर्णधारपदाचे समीकरण आणि सूर्याचा दबदबा – यापूर्वी गिलकडे टी-२० उपकर्णधारपदाची जबाबदारी होती, तर सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे. एकेकाळी गिल हा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, ताज्या निवडीने गिलच्या टी-२० भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निवडकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेही वाचा – Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलचा शतकी धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकली टीम इंडियात दावेदारी शुबमन गिलची कामगिरी – गेल्या १८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. २०२५ मध्ये गिलने १५ टी-२० सामन्यांत केवळ २४.२५ च्या सरासरीने २९१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चालू मालिकेतही त्याची बॅट शांतच राहिली. कटक येथे तो केवळ ४ धावांवर बाद झाला, तर चंदीगडमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही. धर्मशाला येथील सामन्यात त्याने २८ धावा केल्या, पण त्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला होता.