IND vs ENG : दुसऱ्या कसोटीसाठी कुलदीपला का दिली नाही संधी? शुबमन गिलने सांगितलं कारण

IND vs ENG Why Kuldeep Yadav didn’t get a chance : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. बुधवारी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले, परंतु फिरकीपटू कुलदीप यादवला दुसऱ्या सामन्यातही संधी मिळाली नाही. कर्णधार शुबमन गिलने सांगितले की, लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवातून मिळालेल्या धड्यामुळे कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही.
लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती, ज्याचा फटका संघाला बसला. त्यामुळे बर्मिंगहॅम येथे भारताने फलंदाजीला अधिक खोली देण्यावर भर दिला आहे.
कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याचा विचार होता – कर्णधार
No Kuldeep… c’mon😑#KuldeepYadav #ENGvIND pic.twitter.com/kiw2kpyu6Q
— Dipanjan Chatterjee (@I_am_DipCh) July 2, 2025
दुसऱ्या कसोटीची नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “आम्हाला कुलदीप यादवला खेळवायची इच्छा होती, पण आम्ही तळातील फलंदाजी अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला. मागील सामन्यात आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नव्हती.” कुलदीपने २०१७ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
हेही वाचा – IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ काळ्या पट्ट्या बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या कारण
बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ३० वर्षीय कुलदीप यादवला संघात न घेतल्यास ते ‘अन्यायकारक’ ठरेल, असे मत व्यक्त केले होते. त्यानी ‘एक्स’वर लिहिले होते की, “जर कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, तर ते अन्यायकारक असेल. त्यानी ८ वर्षांत केवळ १३ कसोटी सामने खेळले आहेत. यापूर्वी आर. अश्विनमुळे त्याला संघाबाहेर ठेवले गेले होते. पण आता त्याला बाहेर ठेवण्याचे समर्थन कसे करता येईल?”
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतसह 10 स्टार खेळाडूंवर लागणार बोली; IPL नंतर ‘या’ लीगमध्ये चमकणार
भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या जागी आता आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. याशिवाय, साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकुर यांच्या जागी अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.





