IND vs ENG : जैस्वालचा स्टोक्सला टोला; शतक हुकलं, पण चर्चा तुफान

IND vs ENG 2nd Test 1st Day Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल पुन्हा एकदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. मात्र, याचवेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जैस्वालचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे जैस्वाल आणि स्टोक्स यांच्यात मैदानावर काही वेळ शाब्दिक चकमक झाली. जैस्वालने स्टोक्सच्या चेंडूवर चौकार मारला, त्यानंतर स्टोक्स त्याला काहीतरी म्हणाला. ज्यावर जैस्वालने प्रत्युत्तर दिले. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
स्टोक्स-जैस्वालमध्ये झाली शाब्दिक चकमक –
हे सर्व १९व्या षटकात घडलं. स्टोक्सच्या चौथ्या चेंडूवर जैसेवालने टेनिस शैलीत चौकार मारला. पुढच्या चेंडूवर स्टोक्सने चेंडूची लांबी थोडी कमी केली. चेंडू यष्ट्यांच्या जवळ होता. त्यावर जैस्वालने हलक्या हाताने शॉट खेळत एका धावला. तो स्टोक्सच्या जवळून जात असताना, इंग्लंडचा कर्णधार त्याला काहीतरी बोलला. त्यानंतर स्टोक्स जेव्हा आपल्या जागेवर परत जात होता, तेव्हा जैस्वाल म्हणाला, “तुला माझ्याकडून हे ऐकायला नको, चल.” स्टोक्सने हे ऐकलं. त्याने मागे वळून विचारलं, “काय ऐकायला नको?” पुढच्या चेंडूवरही त्यांचं बोलणं सुरूच राहिलं.
Words exchanged between Yashasvi Jaiswal and Ben Stokes. pic.twitter.com/OzbBb6GRES
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2025
स्टोक्सने आणखी एक बॅक-ऑफ-लेंथ चेंडू टाकला. करुण नायरने तो डिफेंड केला. स्टोक्स चेंडूकडे जाण्याऐवजी जैस्वालकडे दोन पावलं चालत गेला आणि म्हणाला, “तू काय म्हणत होतास?” यावेळी यशस्वीने हा वाद पुढे न वाढवता निघून गेला. स्टोक्सने पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु जैस्वाल दुसऱ्या बाजूला जाताना दिसताच, स्टोक्सही माघारी परतला.
हेही वाचा – Wimbledon 2025 : जोकोविचची पोटदुखीवर मात करत विजयी सलामी! झ्वेरेव-गॉफचा धक्कादायक पराभव
यशस्वी जैस्वालचे हुकले शतक –
लंच ब्रेकनतंर यशस्वी जैस्वालच्या रुपाने भारताला तिसरा धक्का दिला. बेन स्टोक्सने जैस्वालला जेमी स्मिथच्या हाती झेलबाद केले. ज्यामुळे जैस्वालचे १३ धावांनी शतक हुकले. त्याने १०७ चेंडूचा सामना करताना१३ चौकारांसह ८७ धावांची खेळी साकारली. त्याने शुबमन गिलसोबत ६६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आता वृत्त लिहिपर्यंत भारतीय संघाने ६५ षटकानंतर ५ बाद २२३ धावा केल्या आहेत. कर्णधार गिल ६६ आणि रवींद्र जडेजा ४ धावांवर खेळत आहे.





