IND vs ENG : शुबमन गिलचा पिच वादावर मोठा खुलासा: क्युरेटरवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO

IND vs ENG Shubman Gill on Oval Pitch Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलच्या पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार शुबमन गिलने पत्रकार परिषदेत यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
शुबमन गिल पत्रकार परिषदेत काय म्हणाला?
शुबमन गिलने गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यातील वादावर भाष्य करताना सांगितले, “मला कळलेच नाही की पिच क्युरेटरने आमच्या मुख्य प्रशिक्षकाशी वाद का घातला. आम्ही या मालिकेत चार सामने खेळलो असून आतापर्यंत कोणीही आम्हाला पिच पाहण्यापासून रोखले नाही. प्रशिक्षक आणि कर्णधार नेहमीच पिच जवळून पाहतात. यात एवढा वाद का घातला, हे मला समजत नाही.”
पिच क्युरेटरवर केले गंभीर आरोप –
#WATCH | London, UK | On the heated conversation between Indian Cricket Team Head Coach Gautam Gambhir and Oval Pitch Curator Lee Fortis, Indian Team Captain Shubman Gill says, “I don’t know what exactly happened yesterday and why the pitch curator did what he did. We have played… pic.twitter.com/rn01pvHOwQ
— ANI (@ANI) July 30, 2025
गिल पुढे म्हणाला, “एखाद्या क्युरेटरने आम्हाला पिच जवळून पाहू नये किंवा तीन मीटर अंतरावरून पाहावी, असे सांगत असेल तर असा प्रकार आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. आम्ही बराच काळ क्रिकेट खेळत आहोत. जोपर्यंत खेळाडू रबर स्पाइक्स किंवा अनवाणी आहे, तोपर्यंत त्याला पिच जवळून पाहण्याची परवानगी असते. ही प्रशिक्षक आणि कर्णधाराची जबाबदारी आहे. मला कळत नाही की क्युरेटरने आम्हाला असे का रोखले.”
हेही वाचा – WCL 2025 : भारत-पाक सेमीफायनल रद्द होणार? असं झाल्यास फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार?
जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत काय म्हणाले?
शुबमन गिलने पाचव्या कसोची सामन्यात जसप्रीत बुमराहच्या सहभागाबाबतही माहिती दिली. या मालिकेत बुमराहला पाचपैकी तीन सामने खेळायचे होते. त्याने आतापर्यंत तीन सामने खेळले असून, तो चौथ्या सामन्यात खेळणार की नाही, हे पाहणे बाकी आहे. हा वाद आणि गिल यांचे वक्तव्य यामुळे शेवटच्या टेस्ट सामन्यापूर्वी चर्चांना उधाण आले आहे. आता सर्वांचे लक्ष उद्याच्या सामन्यावर आणि भारतीय संघाच्या कामगिरीवर आहे.





