IND vs ENG : ‘तू फक्त या ड्रेसिंग रूमलाच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना…’, गौतम गंभीरने पंतच्या जिद्दीला केला सलाम!

IND vs ENG Gautam Gambhir praise Rishabh Pant : भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा इंग्लंड दौरा मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे संपुष्टात आला आहे. मँचेस्टर कसोटीत रिव्हर्स स्वीप खेळताना चेंडू पंतच्या पायाच्या बोटाला लागला. यामुळे त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि त्यामुळे चालू पण शकत नव्हता. त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. स्कॅनमधून समजले की, त्यांच्या पायाच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतरही फलंदाजीला येत अर्धशतक झळकावून संघाला बळकटी दिली, ज्यामुळे गौतम गंभीरने त्याचे खूप कौतुक केले.
चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला. चालतानाही अडचण येत असताना त्याने धावून आणि चौकार-षटकार मारुन धावा अर्धशतकी खेळी साकारली. पाचव्या दिवशी तो काठीच्या आधाराने स्टेडियमवर आला आणि गरज पडल्यास पुन्हा फलंदाजी करण्यास तयार होता. परंतु रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने दमदार शतके झळकावत संघाचा डाव सावरला, ज्यामुळे पंतला फलंदाजी करण्यासाठी यावे लागले नाही.
मुख्य प्रशिक्षक गंभीरने केले पंतचे कौतुक
View this post on Instagram
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचे मनापासून कौतुक केले. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गंभीर म्हणाला, “या कसोटी संघाचा पाया ऋषभने जे केले त्यावर आधारित आहे. मला वैयक्तिकरित्या बोलायला आवडत नाही, मी संघाच्या खेळाबद्दल कधीच वैयक्तिक बोललो नाही. तू फक्त या ड्रेसिंग रूमलाच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहेस. तू स्वतःसाठी आणि या ड्रेसिंग रूममधील प्रत्येकासाठी एक वारसा निर्माण केला आहेस. तुझी कामगिरी अप्रतिम होती, देशाला तुझा नेहमी अभिमान वाटेल.”
प्रत्येक सामन्यात पंतने केली कमाल –
ऋषभ पंतने या मालिकेत चार कसोटी सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटने योगदान दिले. लीड्स येथील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने शतके ठोकली. कसोटीच्या दोन्ही डावांत शतक ठोकणारा तो जगातील केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला. बर्मिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याने अर्धशतक झळकावले. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतच्या बोटाला दुखापत झाली होती आणि तो खूप वेदनांमध्ये होता. तरीही पहिल्या डावात त्याने ७४ धावा केल्या, पण नंतर तो धावबाद झाला. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ५४ धावा केल्या.





