IND vs ENG : ‘हे जर भारतात झालं असतं ना…’, ड्यूक बॉल वादावरुन सुनील गावस्करांनी ब्रिटिश मीडियाचे टोचले कान

IND vs ENG Sunil Gavaskar criticizes Dukes ball : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ड्यूक्स चेंडू पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी भारतीय कर्णधार शुबमन गिल अंपायरशी वाद घालताना दिसला, तर मोहम्मद सिराजही नाराज दिसला. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर काही ओव्हर्सच झाल्या होत्या की, भारताने सुमारे १० ओव्हर्स जुना असलेला ड्यूक्स चेंडूबाबत तक्रार केली. अंपायरनी चेंडू ‘हूप’ (मोजण्याच्या रिंगमधून) काढण्याचा प्रयत्न केला, पण तो रिंगमधून गेला नाही. यावर आता सुनील गावस्करांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय कर्णधार शुबमन गिल अंपायरशी तीव्र शब्दांत वाद घालताना दिसला, कदाचित तो बदललेल्या चेंडूवर नाराज होता. ड्रिंक्स ब्रेकदरम्यानही गिल पंचांशी बोलताना खूप रागात दिसत होता. चेंडूचा हा मुद्दा इथेच थांबला नाही. ४८ चेंडूंनंतर पुन्हा चेंडू बदलावा लागला. या तिसऱ्या कसोटीपूर्वीही, पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चेंडू बदलण्याचा खेळा स्पष्ट दिसला होता. आता या संपूर्ण वादावर भारताचा महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Shubman Gill and India unhappy with the umpires. pic.twitter.com/92qt99sRHQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 11, 2025
सुनील गावस्कर काय म्हणाले –
सुनील गावस्कर यांनी समालोचनादरम्यान सांगितलं, “इथूनही तुम्ही पाहू शकता की ही चेंडू दहा षटकं जुना नाही, तर वीस षटकं जुन्यासारखा दिसत आहे. जर असं भारतात घडलं असतं… जिथे बदललेल्या चेंडूसारखे पुरेसे चेंडू उपलब्ध नसतात, तर ब्रिटिश माध्यमांनी याला नक्कीच मोठा मुद्दा बनवलं असतं.”
हेही वाचा – Wimbledon 2025 : सेमीफायनलमधील पराभवानंतर जोकोविचचे दुखावले मन, निवृत्तीबद्दल केलं मोठं विधान
इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ ४ बाद २५१ धावांवर संपवला होता. त्यावेळी जो रूट ९९ धावांवर आणि बेन स्टोक्स ३९ धावांवर खेळत होते. यानंतर दुसऱ्या दिवशी जो रूटने शतकी, तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ३८७ धावांपर्यंत मजल मारता आला. भारताकडून बुमराहने सर्वाधिकपाच विकेट्स घेतल्या, तर रेड्डी-सिराजने प्रत्येकी दोन आणि जडेजाने एक विकेट्स घेतली.
हेही वाचा – Wimbledon 2025 Final : सिनरने सेमीफायनलमध्ये मारली बाजी! जोकोविचचा धुव्वा उडवत फायनलमध्ये मारली एन्ट्री
भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा –
भारताला पहिल्या डावात शुबमन गिलच्या रुपाने तिसरा धक्का बसला. कर्णधार गिल तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चांगली कामगिरी करू शकला नाही आणि १६ धावा काढून बाद झाला. सध्या भारतीय संघाने ५८ षटकानंतर ३ बाद २०७ धावा केल्या आहेत. त्याबरोबर राहुल-पंत यांच्यात चौथ्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी झाली आहे. ऋषभ पंत ४८ आणि केएल राहुल ८३ धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी यशस्वी जैस्वाल (१३), करुन नायर (४०) बाद झाले.





