IND vs ENG : बुमराहने रचला इतिहास; इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच आशियाई गोलंदाज

IND vs ENG Jasprit Bumrah Historic Five Wicket Haul : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेत भारताला ६ धावांची आघाडी मिळवून दिली. यासह, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. तो SENA देशांमध्ये १५० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विनची आणि परदेशात सर्वाधिक पाच विकेट्स हॉल घेण्याच्या बाबतीत कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
जसप्रीत बुमराहने रचला इतिहास –
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेतले. यासह त्याने एक मोठी कामगिरी केली. बुमराह SENA देशांमध्ये कसोटी स्वरूपात १५० विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. याआधी आजपर्यंत कोणत्याही आशियाई गोलंदाजाने ही कामगिरी केलेली नव्हती. जसप्रीत बुमराहने २४.४ षटकांत ८३ धावा देऊन ५ बळी घेतले. त्याने ५ मेडन ओव्हरही टाकल्या. या SENA देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.
बुमराहने अश्विनच्या विक्रमाची केली बरोबरी –
𝙈𝙖𝙜𝙞𝙘 🪄 𝙈𝙖𝙣!
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/jAECBHHFOX
— BCCI (@BCCI) June 22, 2025
अश्विनने भारतासाठी ४१ डब्ल्यूटीसी सामने खेळले असून ११ वेळा पाच विकेट्स घेतल्या, तर बुमराहने ३६ डब्ल्यूटीसी सामन्यांमध्ये ११ वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. लीड्सच्या हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना ८३ धावांत बाद केले. डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह आणि अश्विननंतर पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांचा क्रमांक येतो, ज्यांनी प्रत्येकी १० वेळा पाच विकेट्स हॉल घेण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ब्रूक-सिराज भिडले! लीड्स कसोटीत तणावपूर्ण शाब्दिक चकमक, VIDEO व्हायरल
बुमराहने कपिल देवच्या विक्रमाचीही केली बरोबरी –
जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेत एक नवा विक्रम आपल्या नावे केला. परदेशात १२ वेळा पाच विकेट्स घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला. बुमराहने हे यश अवघ्या ३४ कसोटी सामन्यांत मिळवले, तर कपिल देव यांनी हाच पराक्रम ६६ कसोटी सामन्यांत साधला होता. कपिल देव यांनीही परदेशात १२ वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्यानंतर इशांत शर्माने ९, झहीर खानने ८ आणि इरफान पठानने ७ वेळा परदेशात पाच विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलच्या निर्णयाने बुमराहची कारकीर्द धोक्यात? जाणून घ्या काय आहे कारण?
भारताबाहेर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू :
- १२- जसप्रीत बुमराह (३४ कसोटी) *
- १२- कपिल देव (६६)
- ९- इशांत शर्मा (६३)
- ८- झहीर खान (५४)
- ७- इरफान पठाण (१५)





