IND vs ENG : शुबमन गिलच्या निर्णयाने बुमराहची कारकीर्द धोक्यात? जाणून घ्या काय आहे कारण?

IND vs ENG Shubman Gill risking Jasprit Bumrah’s career : भारतीय संघाने हेडिंग्ले कसोटी सामन्यात एकूण पाच गोलंदाजी पर्यायांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळे असे वाटते की भारतीय संघ व्यवस्थापन सुपरस्टार जसप्रीत बुमराहवरील दबाव कमी करू इच्छित आहे. व्यवस्थापन बुमराहचा उपयोग छोट्या-छोट्या गोलंदाजीच्या स्पेलमध्य करेल. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. भारतीय संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियात झालेली चूक आता इंग्लंडमध्येही पुन्हा करत आहे.
बुमराहचे करिअर धोक्यात घालत आहे का गिल?
हेडिंग्ले कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने ७७ षटके टाकली होती, त्यापैकी १९ षटके जसप्रीत बुमराह याने टाकली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की भारतीय संघ आपल्या एकूण षटकांपैकी सुमारे २५ टक्के षटके बुमराह याच्याकडून टाकवून घेत आहे. पाच गोलंदाज असूनही बुमराहला इतकी षटके टाकावी लागत आहेत. बुमराह याने आपल्या १९ षटकांमध्ये ६७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
Bumrah 🔥🔥#jaspritbumrah pic.twitter.com/cM0OCyQFpQ
— kesari🕉🚩 (@UnapologeticH_1) June 22, 2025
सध्या वृत्तलिहिपर्यंत इंग्लंड संघाने ८८ षटकानंतर ७ बाद ३९८ धावा केल्या आहेत. सद्यस्थिती पाहता, या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहला आणखी गोलंदाजी करावी लागणार आहे. नुकत्याच दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला असाच तीव्रतेने गोलंदाजी करावी लागली, तर त्याची दुखापत पुन्हा उद्भवण्याचा धोका आहे. पाठीच्या दुखापतीची पुनरावृत्ती झाल्यास बुमराहच्या कारकिर्दीलाही धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा – क्रिकेट विश्वावर शोककळा: IND vs ENG सामन्यादरम्यान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचे निधन
कर्णधार गिल दिसतोय दबावात –
Another drop off #JaspritBumrah — he can’t believe it! Jaiswal drops Brook, and Bumrah’s had three catches dropped. He’ll blame himself for the no-ball that got Pope out. Not his game, despite 3 for 77.#Headingley #TeamIndia #INDvENG #EnglandCricket pic.twitter.com/BlZQrOf7Ez
— lightningspeed (@lightningspeedk) June 22, 2025
लीड्स कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलने फलंदाजी करताना १४७ धावांची खेळी केली, परंतु कर्णधार म्हणून त्याला अद्याप स्वतःला सिद्ध करता आलेले नाही. या सामन्यात गोलंदाजी अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरने आतापर्यंत केवळ ६ षटके गोलंदाजी केली आहेत, तर इतर सर्व गोलंदाजांनी किमान १४ षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी केली आहे. जर कर्णधार गिलला शार्दूलच्या गोलंदाजीवर विश्वास नसेल, तर त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. शार्दूलच्या खराब कामगिरीमुळे जसप्रीत बुमराहवरही दबाव वाढला आहे.





