Jaiswal Sledging Dickwella : “हिंमत असेल तर मारून दाखव!”; जैस्वालच्या स्लेजिंगला डिकेवेला भुलला अन् गमावून बसला विकेट, पाहा VIDEO
Jaiswal Sledging Dickwella : यशस्वीच्या टोमण्यांना उत्तर देण्याच्या आणि हिंमत दाखवण्याच्या नादात त्याचा संयम सुटला आणि बाद झाला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yashasvi Jaiswal Sledges Niroshan Dickwella Video Viral IND vs SL Galle Test Day 5 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी मैदानावर हाय-व्होल्टेज स्लेजिंगचा थरार पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने (Prasidh Krishna) भारताला निरोशन डिकवेलाच्या रूपाने सहावे यश मिळवून दिले असले, तरी या विकेटचे खरे श्रेय क्षेत्ररक्षणात उभ्या असलेल्या यशस्वी जैस्वालला (Yashasvi Jaiswal) जाते. पहिल्या डावात ८० धावांची झुंजार खेळी करणाऱ्या डिकवेलाला यशस्वीने सतत डिवचत जाळ्यात ओढले आणि भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला.
मैदानात नेमकं काय घडलं? यशस्वीने भर मैदानात दिले चॅलेंज!
सोनल दिनुषा आणि कर्णधार धनंजय डी सिल्व्हा यांची जोडी फुटल्यानंतर निरोशन डिकवेला मैदानात आला. प्रसिद्ध कृष्णाच्या उसळत्या चेंडूंसमोर डिकवेला प्रचंड संघर्ष करत होता. नेमकी हीच संधी साधत शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या यशस्वी जैस्वालने त्याला वारंवार चिथावण्यास सुरुवात केली. “पहिल्या डावात दाखवलेस त्यापेक्षा वेगळे शॉट्स मारून दाखव… हिंमत असेल तर तिकडे मोठा फटका खेळ!” असे हातवारे करत जैस्वालने डिकवेलाला थेट आव्हान दिले.
‘हिंमत दाखवण्याच्या’ नादात डिकवेला फसला; विकेट फेकली!
PEAK TEST CRICKET. 😂
Yashasvi Jaiswal and Niroshan Dickwella serving up some good old-fashioned Test match banter. 👀
Watch #SLvIND 2nd Test, starting 23rd August 9 AM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV… pic.twitter.com/KP8M2WUgFg
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 19, 2026
पहिल्या डावात ११५ चेंडूंत ८० धावा कुटणारा डिकवेला दुसऱ्या डावात ७१ चेंडूंत अवघ्या १० धावांवर संयमाने खेळत होता. मात्र, यशस्वीच्या टोमण्यांना उत्तर देण्याच्या आणि हिंमत दाखवण्याच्या नादात त्याचा संयम सुटला. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर गरज नसताना त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि थेट झेल देऊन बसला. डिकवेला बाद होताच यशस्वीने “तुझ्यात हिंमतच नाही!” असा पुन्हा चिमटा काढत मैदानात जल्लोष केला.
पहिल्या डावातील हिरो दुसऱ्या डावात ठरला फ्लॉप!
पहिल्या डावात सोनल दिनुषासोबत शतकी भागीदारी करून श्रीलंकेचा डाव सावरणारा डिकवेला दुसऱ्या डावातही भिंत बनून उभा राहील अशी यजमानांना आशा होती. मात्र, भारतीय संघाच्या आक्रमक रणनीती आणि यशस्वीच्या स्लेजिंगच्या सापळ्यात अडकून तो अवघ्या १० धावांवर माघारी परतला. डिकवेलाची विकेट पडताच श्रीलंकेचा पराभव निश्चित झाला आणि भारताने गॉल कसोटीवर आपले वर्चस्व सिद्ध केले.





