IND vs NZ : चौथ्या वनडेत रोहित शर्मासोबत कोण देणार सलामी? ऋतुराज की इशान? कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या
IND vs NZ 4th ODI India Opener : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार हा एक मोठा प्रश्न आहे. भारताकडे दोन पर्याय आहेत, पण अंतिम निर्णय श्रेयस अय्यरचा असेल.

IND vs NZ 4th ODI Rohit Sharma Opening Partner Shreyas Iyer Captain Ruturaj Gaikwad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना उद्या, शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन पूर्णपणे बदललेली दिसेल. विशेष म्हणजे, माजी कर्णधार रोहित शर्माला आता नवा सलामीचा जोडीदार मिळणार आहे. नियमित कर्णधार शुबमन गिल आणि यष्टिरक्षक केएल राहुल कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंगटनला रवाना झाल्याने या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाहीत.
श्रेयसच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा; पहिल्यांदाच वनडेत करणार नेतृत्व
गिल आणि राहुलच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरकडे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. श्रेयस पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच, यष्टिरक्षक इशान किशनची उपकर्णधारपदी निवड झाली असून त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
सलामीसाठी ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांच्यात चुरस-
🚨 TEAM INDIA UPDATES ON 4TH ODI MATCH 🚨
– Shreyas Iyer is set to lead ODI team in last two match.
– Ruturaj Gaikwad as opener in 4th ODI.
– Ishan Kishan bat at middle Order.
– Mohammad Siraj is likely back in Playing XI.
– Rohit Sharma & Ruturaj Gaikwad set to play as opener.
– Siraj, Auqib Nabi, Gurnoor & Arshdeep Singh fast bowling unit.
– No Kuldeep Yadav in Playing XI.— VIKAS (@Vikas662005) November 12, 2026
शुबमन गिल नसल्याने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडे ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन हे दोन प्रमुख पर्याय आहेत. ऋतुराजने आतापर्यंत मोजकेच एकदिवसीय सामने खेळले असले, तरी मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले आहे. त्यामुळे रोहितसोबत ऋतुराज सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे; तर इशानला केएल राहुलच्या जागी मधल्या फळीत यष्टिरक्षक म्हणून संधी दिली जाऊ शकते.
मालिकेतील आघाडी भक्कम करण्याचे भारतासमोर आव्हान –
🏏 न्यूजीलैंड के खिलाफ पांच मैचों की वनडे सीरीज में 2-0 की बढ़त के साथ चौथे मुकाबले में उतरेगी #TeamIndia 🇮🇳
सीरीज अपने नाम करने से बस एक जीत दूर भारतीय टीम की नजरें होंगी जीत के साथ ट्रॉफी पर कब्जा जमाने पर। 🔥
#NZvIND
@BCCI @ShreyasIyer15 @ICC https://t.co/DH8Qj99289
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 12, 2026
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या आघाडीवर असून तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ मायदेशात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याने चौथ्या वनडेत चुरशीचा थरार रंगेल.
भारतीय संघ: रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, ईशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, तिलक वर्मा, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र, यश ठाकूर.
न्यूझीलंड संघ: विल यंग, फिन ॲलन, निक केली, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिचेल सँटनर (कर्णधार), काईल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, मिचेल हे, ब्रेट रँडेल.





