IND vs ENG 3rd Test, Day 3 India 2nd Innings, Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. सध्या भारताचा दुसरा डाव सुरू आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
IND vs ENG Live : यशस्वी रिटायर्ड हर्ट…
पाठदुखीमुळे शतकवीर यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला आहे. त्याने 133 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. आता तो नंतर फलंदाजीला येऊ शकतो. यशस्वीला खूप वेदना होत होत्या आणि फिजिओला पुन्हा पुन्हा मैदानात यावे लागत होते. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला.
यशस्वी पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी त्याला उभे राहून सन्मान दिला. भारतीय ड्रेसिंग रूममधील सर्वांनीही उठून टाळ्या वाजवल्या. इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही उभे राहत टाळ्या वाजवत त्याच्या खेळीचा सन्मान केला. स्टोक्सनेही यशस्वीचे अभिनंदन केले.
भारताने दुसऱ्या डावात एक विकेट गमावून 189 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची आघाडी 315 धावांवर पोहोचली आहे. शुभमन गिल 61 धावा करून खेळत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी रजत पाटीदार नुकताच मैदानात आला आहे.