Live Cricket Score, Today IND vs ENG 3rd Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. सध्या भारताचा दुसरा डाव सुरू आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 319 धावांवर आटोपला. बेन डकेटने संघासाठी 153 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने 41 धावा केल्या. या काळात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवणारा इंग्लंड तिसऱ्या दिवशी फ्लॉप दिसला आणि दुसऱ्या सत्रातच कोसळला. इंग्लिश संघाने शेवटच्या 5 विकेट अवघ्या 20 धावांत गमावल्या.
Innings break!
England are all-out for 319 in the first-innings.
A successful afternoon session for #TeamIndia as @mdsirajofficial finishes with a four-wicket haul 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gYC0WzQOUm
— BCCI (@BCCI) February 17, 2024
दुसऱ्या दिवशी बेझबॉल क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत 35 षटकांत 2 बाद 207 धावा केल्या होत्या. पण इंग्लंडला तिसऱ्या दिवशी ही लय राखता आली नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 8 विकेट गमावल्या, त्यानंतर भारताला 126 धावांची आघाडी मिळाली.
इंग्लंडने कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ज्या दमदार पध्दतीने फलंदाजी करत खेळ केला, ते पाहता ते तिसऱ्या दिवशी सहज आघाडी घेतील, असा अंदाज बांधला जात होता, कारण त्याच्या 8 विकेट्स शिल्लक होत्या, मात्र तसे झाले नाही. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करत इंग्लिश संघाचा खेळ खराब केला.
भारतीय संघ 445 धावांत सर्वबाद झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजीला उतरताना चांगली सुरुवात केली. सलामीला आलेल्या जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची (80 चेंडू) भागीदारी केली. इंग्लिश संघाला पहिला धक्का 14व्या षटकात जॅक क्रॉलीच्या रूपाने बसला, जो 28 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बेन डकेट आणि ऑली पोप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची (102 चेंडू) भागीदारी केली. मोहम्मद सिराजचा बळी ठरलेल्या ओली पोपच्या रूपाने इंग्लंडने दुसरी विकेट गमावली. पोपने 55 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर अनुभवी फलंदाज जो रूटच्या रूपाने इंग्लंडने तिसरी विकेट गमावली. रूट 31 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 18 धावा करून बाद झाला. रुटच्या विकेटनंतर इंग्लंडला काही विशेष धावा करता आल्या नाहीत.
20 धावांच्या आत इंग्लंडचे 5 फलंदाज बाद
त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स 41 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टोक्सच्या विकेटनंतर इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 299 होती. त्यानंतर संपूर्ण संघ 319 धावांवर बाद झाला. इंग्लंडला सातवा धक्का बेन फॉक्सच्या (13) रूपाने, आठवा रेहान अहमदच्या (06) रूपाने, नववा टॉम हार्टलीच्या (09) रूपाने आणि दहावा धक्का जेम्स अँडरसनच्या (01) रूपाने बसला.
अशी होती भारतीय गोलंदाजी…
या काळात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 यश मिळवले. तर अश्विन आणि बुमराहला 1-1 विकेट मिळाली.