IND vs ENG 3rd Test, Day 3 India 2nd Innings, Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. सध्या भारताचा दुसरा डाव सुरू आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
IND vs ENG Live : यशस्वीने कसोटी कारकिर्दीतील झळकावले तिसरे शतक….
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. त्याने दुसऱ्या म्हणजे शेवटच्या कसोटीत द्विशतक झळकावले होते. त्याने 122 चेंडूत शतक झळकावले. यशस्वी टी-20 मोडमध्ये फलंदाजी करत आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने 40 षटकात एका विकेटवर 168 धावा केल्या आहेत.
A leap of joy to celebrate his second century of the series 🙌
Well played, Yashasvi Jaiswal 👏👏#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pdlPhn5e3N
— BCCI (@BCCI) February 17, 2024
सध्या शुभमन 44 आणि यशस्वी 100 धावांसह फलंदाजी करत आहेत. दोघांनी आतापर्यंत 138 धावांची भागीदारी केली आहे. त्याचबरोबर भारताची आघाडी 294 धावांवर पोहोचली आहे.