Women’s Asia Cup 2024 (Final) : टीम इंडियाचा श्रीलंकेविरूध्द फलंदाजीचा निर्णय, अंतिम सामन्यासाठी ‘अशी’ आहे दोन्ही संघाची Playing 11

Live Cricket Score (IND-W vs SL-W) Final T20 Asia Cup 2024 : भारताने आतापर्यंत सातवेळा आशियाई करंडक स्पर्धा जिंकली आहे. यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाचा आठव्यांदा विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर, स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या श्रीलंकेचा घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवून इतिहास रचण्याचा प्रयत्न असेल.
महिला आशिया कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. विजेतेपदाच्या लढतीत नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. भारतीय संघांची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. हरमनप्रीतने या महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia win the toss and elect to bat in the #Final against Sri Lanka
Follow the Match ▶️ https://t.co/RRCHLLmNEt#WomensAsiaCup2024 | #INDvSL | #ACC pic.twitter.com/T60WCAY7mT
— BCCI Women (@BCCIWomen) July 28, 2024
IND W vs SL W : दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
भारत : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, उमा छेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.
श्रीलंका : विशामी गुणरत्ने, चमरी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविष्का दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधनी, सचिन निसानाला.
जेतेपदासाठी होणारी लढत चुरशीची होणार यात शंका नाही. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभूत केलं. दुसरीकडे श्रीलंकेने बांग्लादेश, मलेशिया, थायलंड आणि उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे.





