IND vs BAN 3rd T20 : क्लीन स्वीपसाठी युवा खेळाडू उत्सुक, भारत-बांगलादेश टी-20 मालिकेतील अखेरची लढत आज…

India vs Bangladesh 3rd T20 :- पहिल्या दोन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून आधीच मालिका खिशात टाकणारा भारतीय संघ शनिवारी हैदराबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 लढतीमध्ये क्लीन स्वीपच्या उद्देश्याने मैदानात उतरणार आहे. या लढतीमध्ये सलामीवीरांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना या मालिकेत संधी मिळाली होती. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आखलेली रणनीती युवा संघाने पूर्णपणे आमलात आणताना आपली क्षमता सिद्ध केली आहे.
कानपूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताने आक्रमक क्रिकेट खेळताना विजय साकारून भारतीय संघाने नवा दृष्टिकोन दर्शविला होता. भारताने दोन सामान्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. आता टी-20 मालिकेत देखील भारतीय संघ 3-0 अशा विजय साकारण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक होणार आहे, त्या दृष्टीकोनातून संघ व्यवस्थापन देखील चांगले पर्याय निर्माण करण्यावर भर देत आहे.
Bangladesh Tour of India 2024
India 🆚 Bangladesh | 3rd T20i
12 October, 2024 | Hyderabad | 07:30 PM (BST)PC: BCCI#BCB #Cricket #INDvBAN #T20 pic.twitter.com/ARGU5goPsj
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 11, 2024
युवा खेळाडूंवर संघ व्यवस्थापनाची नजर
या मालिकेतून पुनरागमन करणारा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती, पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मयांक यादव यांच्या कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर लक्ष ठेवून असणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी देखील स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना गंभीर यांना निराश केले नाही. आयपीएलच्या 2024 च्या हंगामात मयांक यादव बहुतांश सामने खेळाला नव्हता. मात्र या मालिकेत त्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून आपली क्षमता व कौशल्य दाखवून दिले आहे. ग्वाल्हेरमधील लढतीत वरूण चक्रवर्तीने 3 बळी घेताना राष्ट्रीय संघात यशस्वी पुनरागमन केले. 34 चेंडूत 74 धावांची स्फोटक खेळी करणारा नितीशकुमार रेड्डी यांच्या कामगिरीवर देखील संघ व्यवस्थापनाची लक्ष ठेवून असणार आहे. त्याने दिल्लीतील लढतीमध्ये गोलंदाजी करताना 2 बळी देखील टिपले होते.
संजू सॅमसन … जितेश शर्मा
या मालिकेच्य दोन्ही सामन्यामध्ये भारतासाठी सलामीची जोडी डोकेदुखी ठरली आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या दोन लढतीमध्ये सलामीवीरांची भूमिका बजावली होती. मात्र संधी मिळून देखील केरळचा यष्टिरक्षक असलेल्या सॅमसनला याचा फायदा घेता आला नाही. त्याने पहिल्या सामन्यात 29 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 10 धावांचे योगदान दिले आहे. शनिवारच्या सामन्यामध्ये संघ व्यवस्थापन सॅमसन ऐवजी यष्टिरक्षक जितेश शर्माला देखील संधी देऊ शकते.
IND vs BAN 2nd T20 : टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकेतही घेतली अजेय आघाडी…
रवी बिष्णोई, हर्षित राणा यांना संधी ?
पहिल्या दोन सामन्यात संधी मिळून देखील अभिषेक शर्माने केवळ 15 आणि 16 धावा केल्या आहेत. त्याच्याकडून देखील संघ व्यवस्थापनाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. लेगस्पिनर रवी बिश्नोई आणि अष्टपैलू हर्षित राणा यांनाही संधी देण्याचा विचार करू शकते. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव विजयी संघच कायम ठेवून युवा खेळाडूंना पुन्हा संधी देतो का हे पाहणे आवश्यक आहे.
बांगलादेशची शांतो, दासवर मदार
या मालिकेत बांगलादेशच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली आहे. त्यांना कसोटी किंवा टी-20 सामन्यांमध्ये एकही विजय मिळविता आला नाही. शनिवारी शेवटच्या सामन्यात किमान विजय मिळावा, अशी आशा बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनाला असणार आहे. मात्र यासाठी बांगलादेशला दमदार फलंदाजी करावी लागणार आहे. यामुळे कर्णधार शांतो, लिटन दास या दोघांना पुढाकार घेऊन डावाला आकार द्यावा लागणार आहे. यांना इतर फलंदाजानी देखील साथ देणे अपेक्षित आहे. ही साथ मिळाल्यास, बांगलादेश एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी होवू शकेल.
IND vs BAN : दोन्ही संघ खालीलप्रमाणे…
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, तिलक वर्मा.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसैन आमोन, तौहीद ह्रदॉय, महमूदुल्लाह, लिटन दास, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम. हसन साकिब, रकीबुल हसन.





