Eshan Malinga Return : ईशान मलिंगासह सनरायझर्स हैदराबादचे तीन खेळाडू अचानक मायदेशी परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Eshan Malinga Return : सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज ईशान मलिंगासह इतर तीन खेळाडू अचानक मायदेशी परतले आहेत.

Eshan Malinga returns with 3 players to Sri Lanka : आयपीएल २०२६ च्या रोमांचक टप्प्यावर सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पर्पल कॅपचा मानकरी असलेला स्टार वेगवान गोलंदाज ईशान मलिंगा याच्यासह तिघा श्रीलंकाई खेळाडूंना अचानक मायदेशी परतावे लागले आहे. या मागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया.
आयपीएल २०२६ मध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची झोप उडवणारा सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज ईशान मलिंगा याला श्रीलंकाई क्रिकेट बोर्डाच्या सूचनेनुसार अचानक आपल्या मायदेशी परतावे लागले आहे. त्याच्यासोबतच दिलशान मधुशंका आणि कामिंडु मेंडिस या दोन अन्य खेळाडूंनाही श्रीलंकेला जावे लागले आहे.
नेमकं कारण काय?
Dilshan Madushanka, Eshan Malinga and Kamindu Mendis have temporarily returned to Sri Lanka for visa formalities and will rejoin Sunrisers Hyderabad soon. 🟠
📸©IPL/BCCI#IPL2026 #Sunrisershydrabad #Eshanmalinga pic.twitter.com/XYiqWp50km
— KG Sports (@TheKGSports) April 30, 2026
श्रीलंकाई मीडियाच्या अहवालानुसार, या खेळाडूंना मायदेशी परतण्याचे कारण कोणतीही दुखापत किंवा आंतरराष्ट्रीय मालिका नसून व्हिसाशी संबंधित प्रक्रिया आहे. आयपीएल संपल्यानंतर श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने या तिन्ही खेळाडूंना आयपीएलच्या धकाधकीच्या वेळापत्रकातून काही वेळ काढावा लागला.
शुक्रवारी संघात होणार पुनरागमन –
Eshan Malinga takes the lead in the Purple Cap race 🔥 pic.twitter.com/fuyQPQqAOs
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 30, 2026
चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे यामुळे त्यांच्या आयपीएलमधील सहभागावर कोणताही परिणाम होणार नाही. हे तिन्ही खेळाडू शुक्रवारी पुन्हा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. हैदराबादचा पुढचा सामना ३ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध होणार असून, त्यात मलिंगा खेळताना दिसणार आहे.
ईशान मलिंगाने नुकत्याच मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यांत ४ षटकांत केवळ २९ धावा देत १ विकेट्स घेतली होत्या. सध्या तो १५ विकेट्स घेऊन ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे.





