IND vs BAN 2nd T20 : तस्किन अहमदचं भारतीय खेळाडूंबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला “ते मायदेशातच नाही तर जगातील….”

IND vs BAN 2nd T20 (Taskin Ahmed) – भारतीय खेळाडू हे सर्वोत्तम असून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी करू शकतात, हे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याने बोलताना सांगितले.
सध्या सुरु असलेल्या भारत व बांगलादेश दरम्यानच्य टी-20 मालिकेत, बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत, त्यामुळे बांगलादेश संघाला दोन्ही सामन्यांमध्ये भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पहिला सामना सात गडी राखून आणि दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 86 धावांनी गमावल्यानंतर, बांगलादेशवर क्लीन स्वीप करण्यासाठी भारत प्रयत्नशील असणार आहे.
यासंदर्भात बोलताना तस्कीन म्हणाला की, भारतीय क्रिकेटपटू मायदेशातच नाही तर जगातील सर्व ठिकाणी सर्वोत्तम आहेत. फलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त अनुभव असल्याचे तस्कीन म्हणाला.
दुसऱ्या टी-20 लढतीमध्ये तंझीम हसन शाकिब व मुस्तफिजुर रहमान यांनी भारताला सुरुवातीला हादरे दिले होते. त्यानंतर मात्र फिरकीपटूना ती लय राखता आली नाही. याचाच फायदा घेताना नितीशकुमार रेड्डी व रिंकू सिंग यांनी तडाखेबंद खेळी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.
IND vs BAN 2nd T20 : टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकेतही घेतली अजेय आघाडी…
तो म्हणाला, आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगला खेळ केला, मात्र भारतीय संघाने चांगली फलंदाजी केली. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये काहीही होवू शकते, असे तस्कीन बोलताना म्हणाला.





