IND vs BAN 1st Test : फिरकीचा सामना करण्यासाठी आमची फलंदाजी सक्षम – गौतम गंभीर

IND vs BAN 1st Test :- श्रीलंका दौऱ्यातील मर्यादित शतकांच्या मालिकेत भारतीय संघाच्या वरिष्ठ फलंदाजांना फिरकी गोलंदाजांच्या विरोधात संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे आजपासून (गुरुवारपासून) सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील भारताच्या वरिष्ठ फलंदाजांना संघर्ष करावा लागू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आमचे फलंदाज फिरकीचा सामना करणायसाठी सज्ज असल्याचे सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.
पहिला कसोटी सामना : भारत वि. बांगलादेश
तारीख : 19 ते 23 सप्टेंबर 2024
वेळ : सकाळी 9.30 वा.
आजपासून भारत आणि बांगलादेश संघादरम्यान 2 कसोटीच्या मालिकेला सुरुवात होत आहे. बांगलादेश संघाने पाकिस्तान संघाला मायदेशात पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. यामध्ये फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानचे गडी बाद करताना विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आज झालेल्या पत्रकारपरिषदेत प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी यावर भाष्य केले. आमच्या फलंदाजीत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. हे सर्व तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याचे गंभीर यांनी बोलताना सांगितले.
बांगलादेश संघाकडे गोलंदाजांचा चांगला चमू आहे. यात शाकिब अल हसन, मेहदी हसन यांसारखे खेळाडू आहेत. हे प्रतिभावान खेळाडू असले तरी आम्हाला त्यांच्याविरुद्ध पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी करयाची असल्याचे गंबीर यांनी सांगितले. बंगालदेश संघ नुकताच पाकिस्तान संघाच्या विरुद्धची मालिका जिंकूल आला असल्याने बांगलादेश संघाच्या खेळाडूंमध्ये उत्साह जास्त दिसून आला आहे. आम्ही सर्व संघाचा आदर करतो, मात्र कोणत्याही संघाला हलक्यात घेत नसल्याचे सांगताना गंभीर यांनी ही नवीन मालिका असून विरोधी संघ ही नवीन आहे, असल्याचे म्हटले आहे.
बुमराहमध्ये कोणत्याही क्षणी सामना फिरविण्याची क्षमता
भारताचे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांसारख्या गोलंदाजांनी फलंदाजीला महत्त्व देण्याकडे भारताचा कल बदलल्याचेही गंभीर यांनी सांगितले. ‘या गोलंदाजांनी भारताला गोलंदाजीला महत्त्व देणारा देश बनवला. खरंतर बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला अधिकाधिक कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. हे करणे सोपे नाही. तो खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर सामना फिरवू शकतो, असे गंबीर बोलताना म्हणाला.
अश्विन, जडेजा यांची महत्वाची भूमिका
या मालिकेत अश्विन व जडेजा या दोन्ही फिरकीपटूंची महत्वाची भूमिका असणार आहे. दोन्ही गोलंदाज आवश्यकतेनुसार गोलंदाजी करण्यासाठी सक्षम असल्याचे गंबीर यांनी सांगितले. या पूर्वी दोन्ही फिरकीपटूनी अनेकदा महत्वाच्या भागीदारी तोडण्यात यश मिळविले होते. चेंडूवरील नियंत्रण, गरजेनुसार गोलंदाजी करण्याची क्षमता, यष्टीरक्षकाच्या बरोबरीने कर्णधार रोहित शर्मा यांच्या बरोबर असलेला समन्वय या गोष्टीत दोन्ही फिरकीपटू तरबेज आहेत.
ऋषभ पंत महत्वाचा खेळाडू
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतचेही भारतीय प्रशिक्षकाने कौतुक केले. डिसेंबर 2022 मध्ये रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर पंत प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. गंभीर म्हणाला, पंतने स्फोटक फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली आहे परंतु भारतीय परिस्थितीत त्याच्या यष्टीरक्षणाला कमी लेखले गेले आहे. अश्विन आणि जडेजाविरुद्ध त्याने चांगले यष्टिरक्षण केले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक





