Gautam Gambhir Statement : ‘मी देखील एक माणूस आहे अन् मलाही चुका करण्याचा अधिकार…’, विश्वविजेतेपदानंतर गंभीरचा टीकाकारांवर प्रहार
Gautam Gambhir Statement : विजयाचा आनंद साजरा करत असतानाच गंभीरने आपल्या टीकाकारांना सूचक इशारा दिला आहे.

Gautam Gambhir statement on critics after T20 WC 2026 win : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला. या विजयाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या रणनीतीला दिले जात आहे. मात्र, विजयाचा आनंद साजरा करत असतानाच गंभीरने आपल्या टीकाकारांना सूचक इशारा दिला आहे.
‘REVZSPORTZ’ ला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाले, “मी देखील एक माणूस आहे आणि मलाही चुका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्या १८ महिन्यांत माझ्याकडून अनेक चुका झाल्या असतील, पण त्यामागील हेतू नेहमीच प्रामाणिक होता.” गंभीरने स्पष्ट केले की, ड्रेसिंग रूममध्ये तो प्रत्येक खेळाडूशी डोळ्यात डोळे घालून बोलतो. आता चाहते गंभीरच्या या विधानाचा अर्थ रोहित-विराटच्या निवृत्तीशी जोडत आहेत.
प्रामाणिकपणा आणि खेळाडूंना खंबीर पाठिंबा –
Gautam Gambhir on rumours about rifts with Virat Kohli and Rohit Sharma:
🎙️ “I’m human and I should be allowed to make mistakes, just like players. In the last 18 months I must have made mistakes, and I don’t shy away from that. A wrong decision with the right intent is… pic.twitter.com/nb1GIPEUF4
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 16, 2026
गंभीर पुढे म्हणाला, “जर तुमचा हेतू चांगला असेल, तर चुका क्षम्य आहेत. पण चुकीच्या हेतूने केलेली चूक मला मान्य नाही,” असे तो म्हणाला. विश्वचषकादरम्यान अभिषेक शर्माचा खराब फॉर्म असो वा संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा धाडसी निर्णय, गंभीरने आपल्या खेळाडूंवर अढळ विश्वास दाखवला. संजू सॅमसनला सलामीला संधी देण्याचा त्यांचा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला आणि संजू ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ बनला.
पुढचे लक्ष्य: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक!
टी-२० मध्ये जगावर राज्य केल्यानंतर गौतम गंभीरने आता आपले लक्ष ऑलिम्पिककडे वळवले आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, “मला ऑलिम्पिकचा भाग व्हायला नक्कीच आवडेल. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि देशाला सुवर्णपदक मिळवून देणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.”
विश्वचषकातील यशाने गंभीर यांनी हे सिद्ध केले आहे की, केवळ ३-४ सामन्यांतील खराब कामगिरीमुळे खेळाडूंवरचा विश्वास गमावणे चुकीचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आता आगामी मोठ्या आव्हानांसाठी सज्ज झाली आहे.





