India Squad For T20 Series Against Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये, दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आणि तिसरा टी-20 सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. येथे जाणून घ्या, टी-20 मालिकेत कोणत्या 15 खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू शकते.
टी-20 मालिकेतून गायब असतील अनेक मोठी नावे…
जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि यशस्वी जैस्वाल हे स्टार खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत दिसणार नाहीत. पीटीआयने आपल्या एका वृत्तात असा दावा केला आहे. वृत्तामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या पाच स्टार खेळाडूंशिवाय टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. वास्तविक, न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर लगेचच खेळली जाणार आहे. त्यामुळे या पाच खेळाडूंना टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे
इशान किशनचे पुनरागमन शक्य…
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन होईल. इशानने जवळपास 10 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. या मालिकेत ऋतुराज गायकवाडलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रियान पराग आणि हर्षित राणा हे युवा खेळाडू संघासोबत राहतील. या मालिकेत अभिषेक शर्मालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अभिषेकला संधी मिळाली, पण श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याची निवड झाली नव्हती.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, रियान पराग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवि बिश्नोई, वाशिंगटन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार.